शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहरप्रमुख सदानंद शिर्के यांचा ५० वा वाढदिवस सामाजिक बांधिलकीद्वारे साजरा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख सदानंद शिर्के यांचा ५० वा वाढदिवस सामाजिक बांधिलकीद्वारे साजरा
पनवेल दि.१९ (संजय कदम) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खांदा वसाहत शहरप्रमुख सदानंद शिर्के यांचा ५० वा वाढदिवस विविध सामाजिक बांधिलकीद्वारे व त्यांच्या आई-वडिलांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.           यानिमित्ताने सदानंद शिर्के व त्यांच्या सहकाऱ्यांनी बाल आश्रमात जाऊन तेथील लहान मुलांना विविध प्रकारच्या फळांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे तरुणपिढीला प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेटसामान्यांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सेक्टर 13 मधील बेलेजा बँकेट हॉलमध्ये आयोजित वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात शिर्के कुटुंबियांसह रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत, पनवेल महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील


, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, शिवसेना महानगर समनव्यक दीपक घरत, शिवसेना उपमहानगर संघटक शिवाजी दांगट, नवीन पनवेल शहर प्रमुख यतिन देशमुख, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, कळंबोली शहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, महिला आघाडीच्या रेवती सपकाळ, सुजाता कदम, खांदा कॉलनी शहर संघटिका सानिका मोरे, युवासेनेचे पराग मोहिते, सुशांत सावंत, शेकाप कार्याध्यक्ष महादेव वाघमारे, मा नगरसेवक गणेश पाटील, विश्वास म्हात्रे यांच्यासह सदानंद शिर्के यांच्या मित्रमंडळींनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.थोडे नवीन जरा जुने