लाकडी बांबूने तरुणाला मारहाणलाकडी बांबूने तरुणाला मारहाण
पनवेल दि.१२ (वार्ताहर) : इमारतीच्या गेटवर उभे असताना मित्रासोबत झालेल्या वाद हा फिर्यादीमुळे झाला असल्याचा समज करून तरुणाला पाठीमागून येवून लाकडी बांबुने मारहाण केल्याची घटना तळोजा फेज २ येथे घडली आहे. या घटनेची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आला आहे.           सुशीलकुमार वांगे हा तरुण आपल्या राहत्या तळोजा फेज २ आसावरी सोसायटीच्या गेटवर उभे असताना त्याच इमारतीत राहणाऱ्या जिशान शेख (वय 20) याने त्याचे पेठगावातील मित्रासोबत झालेल्या वाद हा सुशीलकुमार यांचेमुळे झाला असल्याचा समज करून त्याच्या पाठीमागून येवून लाकडी बांबुने मारहाण केली.


थोडे नवीन जरा जुने