सरपंच गौरी महादेव गडगे यांच्या हस्ते, ठोंबरेवाडी ( धनगरवाडा )च्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

सरपंच गौरी महादेव गडगे यांच्या हस्ते, ठोंबरेवाडी ( धनगरवाडा )च्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन 


काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : २९ एप्रिल ,  
           गाव तिथे विकास हे समीकरण निर्माण करून अनेक गावामध्ये विकास कामांची गंगा निर्माण केली आहे.नागरिकांची समस्या जाणून घेवून ती पूर्ण करण्यात येत असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.
विशेष म्हणजे ग्रूप ग्राम पंचायत वडगांव हद्दीत असलेली ठाकूर वाडी पासून ते मुख्य रस्त्यापर्यंत ठोंबरेवाडी (धनगरवाडा ) या ठिकाणी डोंगराळ भागात वास्तव्ये करणारे त्यांची ही समस्या सरपंच गौरी महादेव गडगे यांना सातत्याने जाणवत असल्यामुळे ग्रूप ग्राम पंचायत फंडातून हा रस्ता पूर्ण पणे डांबरीकरण करण्यांचे आश्वासन देण्यात आले होते.आणी आज या कामाचा भूमिपूजन सोहळा करण्यात आले.                      या ठिकाणी रस्ता आहे.मात्र या रस्त्यांची दुरावस्था निर्माण झाल्यामुळे याकडे अनेक वर्ष दुर्लक्ष करीत होते. यामुळे आदिवासी बांधव यांना दळणवळण करण्यात अनेक समस्या निर्माण होत असल्यामुळे,गाव तेथे उत्तम दर्जाचे रस्ते झालेच पाहिजे हे समीकरण निर्माण करून,त्यांनी ग्रामपंचायत हद्दीत विकास कामाचा झंझावत निर्माण केला आहे. ठोंबरेवाडीच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत असल्यामुळे मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमीपूजन करण्यात आले.यावेळी सरपंच सह सदस्य यांचे आभार मानले.
       यावेळी ग्रूप ग्राम पंचायत वडगांव सरपंच गौरी महादेव गडगे प्रमुख पाहुणे राजेश पाटील सदस्य, संदीप पाटील सदस्य, संतोष पारिंगे सदस्य , महादेव गडगे सदस्य,ग्रामस्थ राजेश साळुंखे,तुळशीराम ठोंबरे जनार्दन बावदाने,मधुकर बावधने,तुकाराम बावधने, संतोष बावधने, धोंडीराम आखाडे , आंबो भला, हशा भला, मंगेश बावधने ,कल्पेश कोकरे, जयेश तुपे, जगदीश म्हात्रे ,सतीश ठोंबरे व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते .


थोडे नवीन जरा जुने