महामार्गावरी होणाऱ्या अपघातांच्या पार्श्ववभूमीवर वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून रास्ता सुरक्षा बाबत जनजागृती करण्यासाठी प्रबोधन कार्यक्रम
महामार्गावरी होणाऱ्या अपघातांच्या पार्श्ववभूमीवर वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून रास्ता सुरक्षा बाबत जनजागृती करण्यासाठी प्रबोधन कार्यक्रम
पनवेल दि.२९(संजय कदम) : मुंबई -पुणे महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या पार्श्ववभूमीवर यूनिवर्सिटी समोरील पार्किंग येथे अपर पोलीस महासंचालक रवींद्र सिंगल, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्र तानाजी चिखले, पोलीस उप अधीक्षक महामार्ग पोलीस रायगड विभाग संदीप भागडीकर, महामार्ग पोलीस पनवेल विभागाच्या गौरी मोरे यांच्या मागदर्शनाखाली रस्ता सुरक्षा जनजागृती संदर्भात प्रबोधन कार्यक्रम संप्पन झाला.     महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे हद्दीतील मुंबई पुणे द्रुतगती मार्ग पुणे लेन KM 12 अमेठी यूनिवर्सिटी समोरील पार्किंग या ठिकाणी आज अपर पोलीस महासंचालक रवींद्र सिंगल, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्र तानाजी चिखले, पोलीस उप अधीक्षक महामार्ग पोलीस रायगड विभाग संदीप भागडीकर, महामार्ग पोलीस पनवेल विभागाच्या गौरी मोरे यांच्या मागदर्शनाखाली महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे पोलीस उप निरीक्षक गणेश बुरकुल यांच्यासह वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महामार्गावर होणारे अपघात त्याचे कारणे व परिणाम तसेच सदर अपघात कमी करण्यासाठी घ्यावयाची दक्षता व करावयाच्या उपाययोजना तसेच गोल्डन हवर्सचे महत्व याचे अनुषंगाने रस्ता सुरक्षा जनजागती या विषयावर प्रबोधन पर कार्यक्रम घेण्यात आला.

 यावेळी उपस्थित असलेल्या 40-50 वाहन चालक यांना वाहतुकीचे नियमाबाबत सविस्तर मार्गदर्शन करून महामार्गावर वाहतूक करणाऱ्या वाहन चालक यांनी महामार्गावर दिलेल्या वाहतूक चिन्हांचे व सूचनांचे अनुसरून वाहन चालवणे व वाहतुकीचे नियमांचे पालन करणे, वाहन धारक चालक यांनी वाहन चालविताना लायसन्स व वाहनाची कागदपत्रे जवळ बाळगावी, जड वाहने ही महामार्गाचे 3 रे लेनने डाव्या बाजुने चालवून लेनचे नियम पाळावे, मार्गीका बदलताना व ओव्हरटेक करताना इंडिकेटर चा उपयोग करावा, अति वेगाने किंवा विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये, नशा करून वाहन चालवू नये, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये, रात्रीचे वेळी वाहन चालवितांना पुरेशी झोप घेऊनच वाहन चालवावे, वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त मालाची अथवा प्रवाशांची वाहतूक करू नये, केमिकल युक्त धोकादायक हानिकारक पदार्थांची वाहतूक करणे कामी प्रशिक्षित चालकांचीच नेमणूक करावी, वाहनाचा उपयोग करण्यापूर्वी त्याची तांत्रिक स्थिती पाहूनच उपयोग करावा, 
उदा. टायर मधील हवा, पुरेसे इंधन, इंजिनची स्थिती, इंडिकेटर रिफ्लेक्टर इत्यादी, महामार्गावर धोकादायक स्थितीत वाहने उभी करू नये परंतु एखाद्या वाहनात तांत्रिक बिघाड झाल्यास 9822498224 या मोबाईल क्रमांकावर कॉल करून मदत मागवून वाहनाच्या पाठीमागे कोण लावून अथवा बॅरीकेटिंग करून घ्यावी, अपघातामधील व्यक्तींना तात्काळ योग्य ती मदत पुरवून झालेल्या अपघाताबाबत 9833498334 / 100 / 112/ 108/ 8652085500 या क्रमांकावर कॉल करून घटनेबाबत माहिती द्यावी, अठरा वयाखालील व्यक्तींना चार चाकी अथवा दुचाकी चालवण्यास देऊ नये, मोटरसायकल चालविताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा तसेच ट्रिपल सीट बाईक चालवू नये, ओव्हरटेक करताना काळजीपूर्वक समोरील येणारे वाहनाचा अंदाज घेवून ओव्हरटेक करावे, रस्ता ओलांडताना पादचारी यांनी फुटपाथ अथवा भुयारी पूलाचा वापर करावा व रस्त्याचे आजुबाजुचे वाहन पाहून सुरक्षित रस्ता ओलांडावा, वाहन चालविताना नियमित सिट बेल्टचा वापर करावा, 
आपल्या वाहनावर असलेला प्रलंबित दंड त्वरित भरून घेणे, घाट माथ्यावरून उतारा कडे वाहन चालवीत असताना इंधन बचतीसाठी जड अवजड वाहने न्यूट्रल करून किंवा बंद करून चालू नयेत, या संदर्भात प्रबोधन करण्यात आले. तसेच देवून मृत्युजंय दुत व स्व. बाळासाहेब ठाकरे विमा अपघाता बाबत माहीती देऊन अपघात समयी जखमींना हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असे आव्हान करण्यात आलेले आहे. यावेली महामार्गावर वाहने चालवताना पालन करावयाच्या नियमांचे माहितीपत्रके उपस्थितांना वाटप करण्यात आले. 
थोडे नवीन जरा जुने