मंदार काणे एंटरटेनमेंट प्रेसेंटस चित्र मराठी फॅशन शो २०२३ मोठ्या दिमाखात पनवेलमध्ये संपन्नपनवेल दि.०५ (संजय कदम) : मंदार काणे एंटरटेनमेंट प्रेसेंटस ‘चित्र मराठी फॅशन शो २०२३’ मोठ्या दिमाखात फडके नाट्यगृह पनवेल येथे पार पडला. या रनवे शो मध्ये ५० हुन अधिक तरुण-तरुणी मॉडेल्सनी सहभाग घेतला होता. यावेळी सेलीब्रेटी म्हणून अभिनेत्री गायिका शैली बिडवइकर, झी मराठी फेम अभिनेत्री शेफाली म्हणजेच काजल काटे, गोव्याच्या किनाऱ्यावर फेम अभिनेत्री सिद्धी पाटणे, अभिनेत्री मन कौर, रंजना सिंग, दीप्ती हलंकर, अंजली मचा, नीता दोंदे, अश्विनी कासार, सौम्या रेश्मा, कोमल शेटे, सायली वर्तक उपस्थित होते. यावेळी रॅम्पवॉक करताना ५० हुन अधिक तरुण-तरुणी मॉडेलनी आपल्या दिलखेच अदा सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. या शोसाठी माय प्रिन्सेस च्या अंजली परदेशी, झेबाच्या झेबा चौधरी, प्लॅनेट डीझायनरच्या पूर्णिमा आणि जॅक विजय सोनी यांनी विशेष लक्ष देऊन आकर्षक ड्रेस उपलब्ध करून दिले. त्याचसोबत नीता क्रिएशन च्या नीता म्हात्रे पाटील, एनआरएल च्या नर्गिस तसेच एमजी च्या मोनल घोलप यांनी संपूर्ण मेकअप ची जवाबदारी पार पाडली. यासोबत फॅशन सेलीब्रेटी फोटोग्राफर सिद्धेश परब, सेलीब्रेटी शो डायरेक्टर रवी चव्हाण, फॅशन कोरिओग्राफर ओंकार चिकलकर, सिद्धेश पावसकर ,मंदार सुर्वे, नितेश ,विक्रांत यांनी संपूर्ण शो साठी विशेष सहकार्य केले. ह्या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक प्रथमेश चंद्रशेखर सोमण, चितळे एक्सप्रेस, लॅक्मे सलून, रिद्धी हेअर स्टुडिओ, रेडविंग्स हॉटेल, ९९ आचार्य रेडिओ, नील ग्रुप, वीणा वर्ल्ड कामोठे, भाविक म्हात्रे, झारा क्लिक, एसपी फोटोग्राफी, पांडुरंग हरी वैद्य ज्वेलर्स, आर्फिकशन टीम आणि रिषिका धोत्रे यांनी केलेल्या मदतीमुळे कार्यक्रम उत्कृष्ट रित्या पार पडला. यावेळी मंदार काणे यांनी या सर्वाना घेऊन लवकरच वेब सिरीज आणि शॉर्ट फ्लीम तयार करणार असल्याचे आश्वासन दिले तसेच आणखी वेगवेगळे कार्यक्रम पार पडणार असल्याचे अधोरेखित केले.
थोडे नवीन जरा जुने