उरण ते पिल्ले कॉलेज बससेवा सुरु.







ग्रामपंचायत वशेणीच्या पाठपुराव्याला यश.

 विद्यार्थी पालकांमध्ये आनंदाचे वातावरण
उरण दि 5 (विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यात ग्रामीण भागात दळणावळणाच्या अपुऱ्या सोयी सुविधामुळे उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळा, कॉलेज मधील विद्यार्थी व त्या विदयार्थ्याचे पालक यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. विदयार्थी पालकांच्या समस्या लक्षात घेउन उरण ते पिल्ले कॉलेज (मोहपाडा, तालुका खालापूर )अशी बससेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी पत्रव्यवहाराद्वारे वशेणी ग्रामपंचायत तर्फे परिवहन महामंडळाच्या मुंबई मुख्य कार्यालयात करण्यात आली होती. ग्रामपंचायत वशेणीच्या या मागणीला, पाठपुराव्याला यश आले असून परिवहन महा मंडळच्या मुंबई मुख्य कार्यालयाने विद्यार्थी व पालकांच्या समस्या लक्षात घेऊन उरण ते पिल्ले कॉलेज बससेवेला परवानगी दिली आहे.



उरण, पेण, पनवेल, मोहपाडा, रसायनी आदी विभागातील विद्यार्थी हे मोहपाडा, तालुका खालापूर येथे असलेल्या पिल्ले कॉलेज मध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत.या विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी वाहने उपलब्ध नाहीत आणि जी वाहने उपलब्ध आहेत त्याचा येण्या जाण्याचा खर्च सर्वसामान्याना परवडत नाहीत म्हणून अनेक महिन्या पासून उरण ते पिल्ले कॉलेज बससेवा सुरू करावी अशी मागणी विद्यार्थी व पालकाकडून होत होती. मात्र या मागणीला आता मंजुरी मिळाल्याने उरण ते पिल्ले कॉलेज बससेवा सुरु झाली आहे. बससेवा सुरु झाल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या बससेवेचा लाभ उरण, खोपटा,वशेणी, साई, खारपाडा या मार्गावरील विद्यार्थी पालकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.








 कॉलेजची वेळ सकाळी दहा ते पाच असल्याकारणाने बस दररोज सकाळी उरण बस आगारातून 8.20 वाजता सुटणार आहे व कॉलेज संपल्या नंतर 5:15 वाजता बस पिल्लई कॉलेज वरून उरणला येणार आहे. विद्यार्थी पालकांचा प्रतिसाद बघून सदर बसच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.दि 5 एप्रिल 2023 रोजी सदर बससेवेचा शुभारंभ करण्यात आला.वशेणी ग्रामपंचायतच्या सरपंच अनामिका म्हात्रे यांच्या पुढाकाराने उरण परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उरण ते पिल्ले कॉलेज रसायनी मोहपाडा या मार्गे एसटी बस सेवा आज पासून सुरू करण्यात आली



.त्या बसचे स्वागत वशेणी गावचे सरपंच अनामिका म्हात्रे, पोलीस पाटील दीपक म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य संग्राम पाटील, शेवंती पाटील,प्रजा गावंड, कू.ज्योत्स्ना पाटील,जे के पाटील,अभिमन्यू तांडेल,गिरीश पाटील व अन्य मान्यवरांनी केले. उपस्थित सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील,पालक, विद्यार्थी, ग्रामस्थांनी उरण आगार प्रमुखांचे, महामंडळच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे बस सुरु केल्याबद्दल आभार मानले.


थोडे नवीन जरा जुने