मोबाईलची चोरीपनवेल दि.१७ (संजय कदम) : तळोजा येथील घोटगाव येथे सुरु असलेल्या इमारती बांधकामाच्या दुसऱ्या मजल्यावरील रुममध्ये ठेवलेले ४ मोबाईल फोन्स अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 
            तळोजा येथील घोटगाव येथे बांधकाम सुरु असलेल्या अरिहंत अनायका बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडक्या नसलेल्या रुममध्ये ठेवलेले सॅमसंग A33 काळ्या रंगाचा मोबाईल, विवो T 1 कंपनीचा निव्या रंगाचा मोबाईल, सँमसंग A03 कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल, टेको शार्क कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल असे ४ मोबाईल फोन्स अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.थोडे नवीन जरा जुने