उलवे येथून कु. अरबाज खान बेपत्ता.

सदर इसम आढळल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन.
 उरण दि 3( विठ्ठल ममताबादे) कु.अरबाज मोहम्मद ओन खान वय 14 वर्षे,सध्या राहणार फ्लॅट नं 102 आरकोटे बिल्डींग, प्लाट न. 151, सेक्टर 9 उलवे,ता. पनवेल जि. रायगड मुळ गाव अझिमुल्लाह डबरा, पोलिस ठाणे डबरा,जि.सिध्दार्थ नगर, उत्तरप्रदेश असे वर्णनाची व्यक्त्ती दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी उलवे येथून बेपता झाली आहे.अजूनही तीचा शोध लागला नाही.


सदर व्यक्तीचा शरिराचा रंग सावळा, उंची 4 फूट 9 इंच, अंगाने सडपातळ, डोक्याचे केस वाढलेले, दाढ़ी मिश्री आलेली नाही, नाक सरळ, अंगात लाल रंगाचा फूल बाह्याचा टी शर्ट व काळ्या रंगाची फूल जीन्स पॅन्ट, उजवा डोळा कमी उघडतो, थोडासा मतीमंद आहे. या वर्णनाची व्यक्ती कोणाला आढळल्यास त्यांनी न्हावा शेवा पोलिस ठाण्याशी 02227472264 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.न्हावा शेवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गुलाब जगताप अधिक तपास करीत आहेत.थोडे नवीन जरा जुने