सांस्कृतिक संवर्धनासाठी समाजाचे योगदान हवे -डॉ. समिधा गांधी


सांस्कृतिक संवर्धनासाठी समाजाचे योगदान हवे
-डॉ. समिधा गांधी

 पनवेल - सांस्कृतिक, वैचारिक संवर्धनासाठी समाजाचे योगदान हवे असे प्रतिपादन पनवेलमधील दंतवैद्य डॉ.समिधा गांधी यांनी नवीन पनवेल येथे केले .नवीन पनवेलच्या आचार्य अत्रे कट्ट्यातर्फे डॉ. समिधाचा कथावसंत या कथाकथन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
       त्यापुढे म्हणाल्या, मोबाईलच्या सवयीने मेंदू शिथील होत जातो, त्याला चालना द्यायची तर आचार्य अत्रे कट्ट्यासारख्या संस्था सादर करीत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना आर्थिक मदत करणे व भावी पिढीला अशा कार्यक्रमांची संवय लावणे यातून आपण योगदान देऊ शकतो असे त्या म्हणाल्या.
       आपल्या कटुंबात येणाऱ्या सुनेला कसे सामावून घ्यावे हे सांगणारी मिठाची मिठास, पोटाची खळगी भरण्यासाठी बाल वयातच तोंडाला रंग फासण्यास मजबूर करणारी रंग , दुःखद प्रसंगी सुद्धा हसण्यास प्रवृत्त करणारी आयडियाची कल्पना, बालकांचा निरागसपणा दाखवणारी हापूस, प्रेमाची ग्रामीण झलक दाखवणारी व्हॅलेंटाइन बाबा की जय हो, जावईबापूंना धडा शिकवणारी मुंबई पुणे मुंबई व दोन मित्रांतील अतूट मैत्री दाखविणारी एक कटींग असाही या कथांतून डॉ. समिधा गांधी यांनी मानवी जीवनाचे विविध कंगोरे दाखवित श्रोत्यांना मुग्ध केले.आचार्य अत्रे कट्टा नवीन पनवेलचे अरविंद करपे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.थोडे नवीन जरा जुने