उलवेमध्ये स्टीलची चोरी,


 रस्त्यावर टेम्पो उभा करून सुरु होती चोरी .


 संदिप म्हात्रे व राहुल पाटील यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.

दोन महिला व एक पुरुषाचा चोरीत समावेश.


टेम्पो रस्त्यावरच सोडून चोरांचे पलायन.

पोलिसांद्वारे चोरांचा तपास सुरू


उरण दि 21 (विठ्ठल ममताबादे ) नवी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उलवे नोड परिसरात दिवसेंदिवस चोरिच्या घटना वाढतच आहेत. वाढत्या चोरीमूळे पोलिसांसमोर नवे आव्हानच उभे राहिले आहे. मात्र, अशातच उलवे मध्ये चोरी होताना चोरांचे वाहन हाती लागले आहे.


 दि. 21 एप्रिल 2023 रोजी मनसेचे उलवे शहर अध्यक्ष राहुल पाटील हे सकाळी 7 च्या सुमारास त्यांच्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असताना 'उलवे गाव उपाध्यक्ष संदिप राम म्हात्रे यांनी उलवे नोड मधील सेक्टर 24 येथे काही व्यक्ती रस्त्यावर टेम्पो लावून स्टीलची चोरी करत असल्याचे सांगितले.


 संदिप म्हात्रे यांचा कॉल येताच राहुल पाटील हे सेक्टर 24 उलवे येथे पोहोचले. त्यावेळी चोर स्टीलची चोरी करून टेम्पो मध्ये स्टील भरत होते.मात्र चोरांना पकडले असताना मात्र चोरांनी नजर चुकवून पळ काढला. मात्र चोरांचे वाहन तिथेच राहले. MH. 06. BG .465 असे या वाहनाचे नंबर आहे. सदर घटनेची माहिती संदिप म्हात्रे यांनी एन आर आय पोलिस स्टेशनला कॉल करून कळविली. एन आर. आय पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक संदिप पारखे आणि हवालदार भास्कर कदम हे घटनास्थळी हजर झाले त्यांनी सर्व चौकशी करून, घटनास्थळाची पाहणी केली. चोर नेमके कोण होते याचा पुढील तपास सदर पोलिस कर्मचारी करत आहेत. संदिप म्हात्रे व राहुल पाटील यांच्या सतर्कतेमुळे सदर चोरी उघडकीस आल्याने संदिप म्हात्रे व राहुल पाटील यांच्या धाडसीपणाचे सर्वत्र कौतूक होत आहे.


थोडे नवीन जरा जुने