श्री कोळेश्वर चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा शिवसेनेचे आयुक्तांना निवेदनपनवेल दि.०७ (संजय कदम) : पनवेल शहरातील उरण नाका येथे असलेल्या श्री कोळेश्वर चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा अशी मागणी शिवसेना युवासेना शाखा प्रमुख प्रणित मालगुंडकर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांना निवेदनाद्वारे केली आहे.

 यासंदर्भात युवासेना शाखा प्रमुख प्रणित मालगुंडकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, पनवेल शहरामध्ये प्रवेश करणारी तसेच बाहेर बाहेर पडणारी वाहने सुध्दा कोळेश्वर चौकामधूनच जातात. तसेच पनवेल शहरामध्ये विविध चौकामध्ये सि.सी. टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आलेले आहे. परंतु कोळेश्वर चौकामध्ये सि.सी. टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे पनवेलमध्ये कोणत्याही प्रकारचा वाहनांव्दारे किंवा व्यक्तीव्दारे अनुचित प्रकार घडल्यास त्याची ओळख होण्यासाठी व पोलीसांना गुन्हयाचा तपास करण्यास मदत होण्यासाठी तसेच गुन्हेगारांना आळा बसण्यासाठी पनवेलमधील कोळेश्वर चौकात सिसीटीव्ही कॅमेरा बसविणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर कोळेश्वर चौकात सिसीटीव्ही कॅमेरे बसवा अशी मागणी प्रणित मालगुंडकर यांनी केली आहे. 
थोडे नवीन जरा जुने