खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये “बॅक टू द रूट्स" या संकल्पनेवर आधारीत आरोग्य दिन साजरा


खारघर: दरवर्षी जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल 2023 रोजी जागतिक स्तरावर आरोग्यविषयक समस्यांबद्दल जागरूकता करण्यासाठी साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) वतीने दरवर्षी साजऱ्या केल्या जाणाऱ्या जागतिक आरोग्य दिनाचा 75 वा वर्धापन दिन "हेल्थ फॅार ऑल" या संक्लपनेसह साजरा केला जात आहे.जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मेडीकव्हर हॉस्पिटल्सने निरोगी जीवनशैलीच्या सवयींचे पालन करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी "बॅक टू द रूट्स" ही संकल्पना सादर केली. पूर्वीपासून पाळल्या जाणाऱ्या आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व व त्यांचे फायदे याविषयी नागरिकांमध्ये चांगल्या आरोग्याच्या सवयी रुजविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
भारतीय संस्कृती आणि परंपरांना वैज्ञानिक ज्ञानाचे वरदान लाभले आहे. आपले पूर्वज अनेक वर्षांपासून या प्राचीन आयुर्वेदिक पारंपरिक पद्धतींचे पालन करत आहेत जेणेकरून शरीर आणि मन सुदृढ राहिल.मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उद्देश भारतीय पारंपारिक राहणीमानाच्या महत्त्वाविषयी जागरूकता पसरवणे आहे जेणेकरून आजच्या पिढीतील लोक निरोगी जीवन जगू शकतील आणि विविध रोगांना प्रतिबंधित करू शकतील. काही भारतीय पारंपारिक पद्धतीनुसार तयार केलेल ताकाचे सेवन करणे, मातीच्या भांड्यात अन्न शिजवणे, घरात प्रवेश करण्यापूर्वी पादत्राणे बाहेर ठेवणे, हाताने खाणे, भारतीय बैठकीनुसार बसून आहार घेणे आणि पाणी पिणे, घरी बनवलेले ताज्या अन्नाचे सेवन करणे, वेळेवर जेवण करणे, सकाळी लवकर उठणे अशा चांगल्या सवयींचा यात समावेश होतो. सकाळी इ.या प्रसंगी उपस्थित असलेले मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल कृष्णा सांगतात की, आधुनिक औषधांचे फायदे आहेत, परंतु आपण आपल्या पूर्वजांकडून बरेच काही शिकू शकतो, ज्यांनी निरोगी राहण्यासाठी नैसर्गिक उपायांवर आणि साध्या जीवनशैलीतील बदलांवर अवलंबून होते. बॅक टू द रूट्स ही यावर्षीची जागतिक आरोग्य दिनाची उत्कृष्ट थीम होती, जी आम्हांला निसर्गाशी पुन्हा जोडण्यासाठी आणि शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या संपूर्ण आरोग्य सुधारणाऱ्या पारंपारीक पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करते.मला आशा आहे की बॅक टू द रूट्स थीमने लोकांना आपल्या समृद्ध भारतीय संस्कृती आणि परंपरेची जाणीव करून दिली आहे आणि यामुळे आपल्या ज्येष्ठांना सक्रिय जीवनशैली जगण्यास कशी मदत झाली आहे. या मोहिमेचा प्रचार करून मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उद्देश लोकांना त्यांच्या निरोगी आरोग्यास प्राधान्य देण्यासाठी प्रेरित करणे आहे असे डॉ. डॉ मनीष पेंडसे, इंटर्नल मेडीसिन एक्स्पर्ट, मेडिकव्हर हॉस्पीटल्स, खारघर यांनी स्पष्ट
केले.जागतिक आरोग्य दिन मोहिमेमध्ये प्रत्येकाच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी, मेडीकव्हर हॉस्पिटल्सने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर टिप्पणी करणाऱ्या प्रत्येकाला मोफत आरोग्य तपासणी कूपन दिले जाणार असून निरोगी जीवन जगण्याचा मोलाचा सल्ला या माध्यमातून दिला जात आहे.


थोडे नवीन जरा जुने