पनवेल महानगरपालिकेच्या खांदा कॉलनी वसाहतीमधील पठाणी कर वसुलीबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व शेकाप आक्रमक







पनवेल दि ०७ (वार्ताहर) : उच्च न्यायालयात प्रलंबित असलेली महापालिकेविरुद्धची याचिका फेटाळली तर मालमत्तेची जप्ती करण्यात येईल अश्या प्रकारचे धाक दाखवून खांदा वसाहतीमध्ये कर धारकांकडून बेकायदेशीर पणे सुरु असलेली कर वसुली बाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाले असून याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना जाब विचारात अश्या प्रकारे पठाणी कर वसुलीचा शेकाप व शिवसेना कडून तीव्र निषेध करणात आला. 



                      खांदा वसाहतीमध्ये मालमत्ता कर धारकांना प्रत्यक्ष भेटून याचिका फेटाळली, जप्ती येईल अश्या प्रकारे धाक दाखवून कर धारकांकडून बेकायदेशीर पणे पनवेल महापालिकाची कर वसुली सुरू आहे. याबाबत करधारकांनी याचिकाकर्ते तथा शेकाप कार्याध्यक्ष महादेव वाघमारे तसेच खांदा कॉलनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख सदानंद शिर्के व उप शहर प्रमुख दत्तात्रेय महामुलकर यांनी फोन करून माहिती दिली असता त्यांनी त्या ठिकाणी भेट दिल्यावर लेखनिक गणेश पाटील व त्यांच्या सोबत दोन कर्मचारी महिला व पुरुष सेक्युरिटी गार्ड आणि एक कॅमेरामन असा सहा जणांचा फौजफाटा घेऊन महापालिका कडून करधारकाना धमकावून कर वसुली होत असल्याचे निदर्शनास आले.


 त्यानंतर लगेचच महादेव वाघमारे यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्याशी संपर्क करून पोलिसांना बोलावून घेतले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अशी पठाणी कर वसुली करणे हे अन्यायकारक असून महापालिका अधिकाऱ्यांना याबाबतचा जाब विचारत महापालिकेचा शेकाप व शिवसेना कडून तीव्र निषेध करण्यात आला. त्यांनतर आलेल्या अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. अश्या प्रकारे धाक दाखवून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कर वसुलीसाठी आल्यास आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महादेव वाघमारे यांनी केले. यावेळी याचिकाकर्ते तथा शेकाप कार्याध्यक्ष महादेव वाघमारे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख सदानंद शिर्के, उप शहर प्रमुख दत्तात्रेय महामुलकर, उपशहरसंघटक प्रकाश वानखेडे, उपविभाग प्रमुखसचिन धाडवे,शिवसैनिक तानाजी घारे आदी उपस्थित होते. 




थोडे नवीन जरा जुने