पनवेल परिसरात आढळला अनोळखी मृतदेह







पनवेल दि.१७ (संजय कदम) : पनवेल परिसरातील कोळीवाडा येथे एका ४० ते ४५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला आहे. पनवेल शहर पोलीस सदर इसमाच्या नातेवाईकांचा शोध घेत आहे



 
             सदर अनोळखी इसमाचे अंदाजे वय ४० ते ४५ वर्षे असून रंगाने सावळा, उंची ५ फुट ४ इं डोकीचे केस काळे मध्यम वाढलेले, चेहरा उभट, दाढी मध्यम वाढलेली, अंगाने मध्यम, अंगात नेसुन फुल | बाहयाचा तपकीरी रंगाचा फुल बाहयांचा मळकटलेला शर्ट, निळया रंगाची फुल पॅन्ट, फिक्कट ग्रे रंगाची अंडरविअर घातलेली आहे. या इसमाबाबत किंवा त्याच्या नातेवाइकांबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलिस दूरध्वनी क्र.०२२-२७४५२३३३ किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेटे यांच्याशी संपर्क साधावा.


थोडे नवीन जरा जुने