अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा पाय फ्रॅक्चरपनवेल दि.१७ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील चिंचपाडा ब्रिजखाली पिण्याचे पाणी आणण्याकरीता गेले असता इसमाला अज्ञात वाहन चालकाने पाठीमागुन जोराची ठोकर मारल्याने त्याचा डावा पाय फॅक्चर झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
                   करंजाडे येथे राहणारे राजेश कुमार केवट (वय ३०) चिंचपाडा ब्रिजखाली पिण्याचे पाणी आणण्याकरीता गेले असता अज्ञात वाहन चालकाने रस्त्याचे परिस्थीकडे दुर्लक्ष करून हयगईने बेदारकार पणे चालवुन राजेशला पाठीमागुन जोराची ठोकर दिली. यामुळे त्याचा डावा पाय घोटयाजवळ फॅक्चर झाला असून अज्ञात वाहनचालकाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


थोडे नवीन जरा जुने