स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांची श्री संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी उत्सवाला भेट


स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांची श्री संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी उत्सवाला भेट
पनवेल दि.१९ (संजय कदम) : पनवेल शहरातील कुंभारवाडा येथील संत श्री गोरा कुंभार प्रतिष्ठाण सामाजिक संस्थेच्या वतीने श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या ७०६ वर्ष समाधी सोहळा (पुण्यतिथी) उत्सव सोहळयाला स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी भेट देत संत श्री गोरा कुंभार यांचे दर्शन घेतले. यावेळी पंचकमिटीतर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.  


 
                 दरवर्षीप्रमाणे या वर्षीही संत परीक्षक, वैराग्याचे महामेरू श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या ७०६ वर्ष समाधी (पुण्यतिथी उत्सव) सोहळा पनवेल शहरातील कुंभारवाडा येथील संत शिरोमणी गोरोबा काका मंदिरात साजरा करण्यात आला. यावेळी पंचकमिटीतर्फे दत्तात्रेय पनवेलकर, गंगाराम कळवेकर, गजानन वाजेकर, सुरेश कल्याणकर, दिलीप पनवेलकर, मंडळाचे अध्यक्ष किरण कळवेकर, उपाध्यक्ष नरेंद्र पनवेलकर, खजिनदार दैवत पनवेलकर, सचिव अॅड. आशिष विजय पनवेलकर, महिला पंचकमिटीतर्फे सुशिला वाजेकर, सुनंदा पनवेलकर, सुवर्णा कळवेकर, विमल वाजेकर, दिपाली पनवेलकर, महिला कार्यकारीणी अध्यक्ष मानसी पनवेलकर, उपाध्यक्ष समिक्षा कळवेकर, खजिनदार नयना पनवेलकर, सचिव ज्योती कपिल कळवेकर यांच्यासह कुंभारवाडा युवक मंडळ, ओम चैतन्य नवनाथ मित्र मंडळ, राजमुद्रा मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.थोडे नवीन जरा जुने