शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे चषक २०२३ ग्रामीण नाइट क्रिकेटचे सामन्यांचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते उदघाटन*

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चषक २०२३ ग्रामीण नाइट क्रिकेटचे सामन्यांचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते उदघाटन
पनवेल दि.१२ (संजय कदम) : जय हनुमान क्रिकेट संघ मोठे भिंगार (पनवेल ग्रामीण) आयोजित जिल्हाप्रमुख शिरीष घरत पुरस्कृत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चषक २०२३ ग्रामीण नाइट क्रिकेटचे सामने ११ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल पर्यंत आयोजित करण्यात आले आहे . या क्रिकेट सामान्यांचे उद्दघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
           यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक दिपक घरत, उरण तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, उपतालुका प्रमुख विष्णु लहाणे, शहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, भिंगारचे सरपंच ज्ञानेश्वर ठाकूर, उपसरपंच प्रकाश पाटील शेकापच्या महिला कळंबोली शहर अध्यक्षा सरस्वती काथारा आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या क्रिकेट सामान्यांचे शिवसेना शाखा प्रमुख भिंगार संदीप घोगरे, उपसरपंच प्रकाश पाटील, धर्मेद्र घोगरे यांनी उत्तम असे नियोजन केले होते. 
थोडे नवीन जरा जुने