मा.मुख्यमंत्री महोदय मार्गदर्शन करीत आहेत





येत्या १६ तारखेला कार्यक्रम आहे,नियोजन काळजीपूर्वक व्हावे

हा पुरस्कार आदरणीय अप्पासाहेबांना मिळतोय आणि या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उंची वाढणार आहे.

शासनाची आणि प्रशासनाची सर्वस्वी जबाबदारी आहे, त्यांना श्री सदस्य सहकार्य करण्यासाठी सज्ज आहेत.

कोकण परिक्षेत्रातील प्रत्येक महानगरपालिकेने उपायुक्त दर्जाचा अधिकारी प्रत्येक गोष्टीसाठी समन्वय राखण्यासाठी नेमावा



सर्वच घटकांनी जबाबदारीचे भान ठेवून दिलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडावी

अंदाजे वीस लाखांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने अत्यंत काळजीपूर्वक काम करावे

स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालय या व्यवस्थेकडे विशेष लक्ष दिले जावे

कायदा व सुव्यवस्था त्याचप्रमाणे पार्किंगचीही योग्य ती व्यवस्था करावी, पोलिसांबरोबर ट्राफिक वॉर्डननाही या व्यवस्थेत सहभागी करून घ्यावे

पस्तीस ते चाळीस हजार वाहने या ठिकाणी येण्याची शक्यता, त्यामुळे त्याबाबतही योग्य ती खबरदारी घेण्यात यावी




लोकांची कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी व्यवस्थित काळजी घ्यावी

निधीची कमतरता पडू देणार नाही

नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका यांची विशेष जबाबदारी आहे

आरोग्य यंत्रणेने आवश्यक ती सर्व तयारी चोख ठेवावी

वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय पथके यांनी पूर्ण तयारी ठेवावी

इतक्या तातडीने आपण बैठक घेत आहोत याबाबत सर्वांनी गांभीर्याने विचार करावा आणि त्याप्रमाणे काटेकोर नियोजन करून कार्यक्रम यशस्वी, शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सज्ज होऊया

माझ्यासह सर्वांनी झोकून देऊन काम करूया, ना भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम होऊन त्याची इतिहासात नोंद घेतली जाईल असा कार्यक्रम करु
माननीय मुख्यमंत्री प्रसार माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत आहेत


थोडे नवीन जरा जुने