गांजा अंमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी दोघांवर कारवाई

पनवेल दि , ०९ (वार्ताहर) : गांजा अंमली पदार्थ जवळ बाळगून तो चिलीम मध्ये भरून दोघे आळीपाळीने झुरके मारत असताना आढळून आल्याने गुन्हे शाखा कक्ष २ पनवेल च्या पथकाने कारवाई केली आहे .                          शहरातील पीर कलम अली शहा बाबा दर्ग्याच्या पाठीमागील सर्व्हिस रोड वर दोन इसम गांजा अंमली पदार्थ जवळ बाळगून तो चिलीम मध्ये भरून दोघे आळीपाळीने झुरके मारत असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रशांत काटकर व पथकाने सदर ठिकाणी छापा मारून दोघा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २७ अन्व्ये कारवाई केली आहे.थोडे नवीन जरा जुने