अज्ञात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू






अज्ञात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू
पनवेल दि , ०९ (वार्ताहर) : अज्ञात वाहनाची धडक मोटारसायकलीस बसल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना प्रभात कंपनीच्या जवळ सावरोली- खारपाडा रोड , धामणी येथे घडली आहे. 


साई देवघरे ( वय २०) हा त्याचा मामा हे मोटारसायकलवरून घरी परत जात असताना त्यांच्या गाडीला अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात साई हा गंभीररित्या जखमी होऊन त्यात त्याचा दु र्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने