पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेसह महाविकास आघाडीचे ७ सदस्य बिनविरोध
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सह महाविकास आघाडीचे ७ सदस्य बिनविरोध
पनवेल दि.१० (संजय कदम) : पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सह महाविकास आघाडीने विजयी सलामी दिली असून या निवडणुकीत आघाडीचे ७ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.                  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे १, काँग्रेसचे १ व शेकापचे ५ असे ७ सदस्य निवडून आले आहेत. यामध्ये देवेंद्र पाटील, सुभाष पाटील, सुनील सोनवणे, प्रताप हातमोडे, रामचंद्र पाटील, सखाराम पाटील व ललिता गोपीनाथ फडके हे बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रताप चंद्रकांत हातमोडे यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांनी शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांची भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शनपर आशिर्वाद घेतले. यावेळी पनवेल तालुकाप्रमुख विश्वास पेटकर, तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष गिरवले ग्रामपंचायत महेंद्र गायकर आदी उपस्थित होते. 
थोडे नवीन जरा जुने