शिवा संघटनेच्या वतीने वाशी नवी मुंबई येथे 15 मे 2023 रोजी महात्मा बसवेश्वर जयंती व वधू वर मेळाव्याचे आयोजन.






शिवा संघटनेच्या वतीने वाशी नवी मुंबई येथे 15 मे 2023 रोजी महात्मा बसवेश्वर जयंती व वधू वर मेळाव्याचे आयोजन.उरण दि 5(विठ्ठल ममताबादे )वीरशैव लिंगायत समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना तर्फे विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी नवी मुंबई येथे सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी दुपारी 2.30 ते 5.00 यावेळेत वधुवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे.



व नंतर लगेचच दुपारी 5.00 वाजता क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर जयंती विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे.



क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर जयंती व वीरशैव लिंगायत समाजातील जाती पोटजातीचा वधूवर मेळावा असे दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी एकाच ठिकाणी विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर वधु वर परिचय मेळावा निशुल्क आहे. वधुवर मेळावा व महात्मा बसवेश्वर जयंतीच्या अधिक माहितीसाठी खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावे
उद्धव रामराव खराडे-8108464819,
 देवेंद्र कोराळे-9987030967,
 रमाकांत पाटील-9324572398,
वैशालीताई मेनकुदळे-9820890101,
वैशाली पाटील-98336 92647,
 वैशाली लाठे -90822 96969



थोडे नवीन जरा जुने