कळंबुसरे येथे रक्तदान शिबीर व आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार 2023 वितरण सोहळ्याचे आयोजन.
कळंबुसरे येथे रक्तदान शिबीर व आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार 2023 वितरण सोहळ्याचे आयोजन.
उरण दि 23 (विठ्ठल ममताबादे ) माणुसकीची साथ, मदतीचा हात असे ब्रीद वाक्य डोळ्या समोर ठेवून समाजातील गोरगरिबांना मदतीचा हात देण्याच्या व सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने 20 एप्रिल 2023 रोजी सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली. समाजसेवेची आवड असणारे व सुरवातीपासून सामाजिक कार्यात सक्रीय असणारे उरण तालुक्यातील कळंबुसरे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य समीर शंकर म्हात्रे यांनी या संस्थेची स्थापना केली. 


सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबुसरे या संघटनेच्या वतीने रविवार दि 4/6/2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत रक्तदान शिबीराचे तर सकाळी 10 वाजता विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध सामाजिक संस्था , संघटनांना यावेळी आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार 2023 ने गौरविण्यात येणार आहे. रक्तदानासाठी समर्पण ब्लड बँक घाटकोपर यांचे विशेष सहकार्य लाभणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या रक्तदान शिबीरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे. रक्तदान करणाऱ्या इच्छुकांनी नाव नोंदणी तसेच अधिक माहितीसाठी अध्यक्ष समीर म्हात्रे - 9594076657उपाध्यक्ष सचिन पाटील - 8419540860
सचिव संजय म्हात्रे- 9594265188
कार्याध्यक्ष पदमाकर पाटील 7045231736
खजिनदार - शैलेश भोजने - 98212068 21
सल्लागार विठ्ठल ममताबादे 9702751098
यांच्याशी संपर्क साधावे.

थोडे नवीन जरा जुने