जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत सामुदाईक उपोषण.







जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत सामुदाईक उपोषण.
जेएनपीटी साडेबारा टक्के प्लॉट संघर्ष व पाठपुरावा समिती द्वारे उपोषणाचे आयोजन.

उरण दि १३(विठ्ठल ममताबादे )
कामगारांच्या, प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवार दि.२३ मे २०२३ पासून सकाळी १० वाजल्या पासून जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण प्रकल्पग्रस्त बेमुदत सामुदाईक उपोषण सुरु करणार असल्याची माहिती कामगार नेते भूषण पाटील यांनी दिली.जेएनपीटी साडे बारा टक्के प्लॉट संघर्ष व पाठपुरावा समिती द्वारे जेएनपीटी प्रशासन भवन (ऍडम) समोर या उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे.कामगारांच्या,

प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्याकडे शासनाने जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बेमुदत सामुदायिक उपोषणाचे हत्यार प्रकल्पग्रस्त तसेच कामगारांनी उचलले आहे.


पाच हुताम्यांच्या बलिदानातुन, अनेकांना गोळी लागुन सांडलेल्या रक्तातुन, भोगलेल्या जेलमधुन व हजारोंच्या संख्येने लाठीमार खालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातुन व दिवंगत लोकनेते दि.बा.पाटिल साहेब यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रदिर्घ लढयातुन जे.एन.पी.टी. प्रकल्पग्रस्तांच्या १२.५% जमिन वाटपाचा प्रश्न अंतिम टप्पात आला आहे. त्या जमिनीचे विकासकार्य चालु असुन लवकरच त्यांचा ताबा मिळणार आहे. परंतु अजुनही अनेक अडथळे व कारवाई प्रलंबित आहेत.



 त्या सोडवुन प्रत्यक्ष हातात जमिनीचा ताबा मिळण्यासाठी संघर्ष व पाठपुरावा चालु ठेवण्याची शेवटपर्यंत गरज आहे. दि.१८ जानेवारी २०२१ रोजी सदर जमिन वाटप करण्यासाठी जे.एन.पी.टी. व सिडको यांच्यामध्ये समझोता करार (MOU) झाला आहे. त्यामधील तरतुदी व अटी शर्तीमुळे विलंब होऊ शकतो. त्यातील अडीअडचणी दुर करण्यासाठी व नियमित पाठपुरावा करून जमिनीचा ताबा लवकरात लवकर मिळवण्यासाठी सदर कमिटी प्रयत्नशील राहील.असे कॉम्रेड भूषण पाटील यांनी सांगितले.२३ मे पासुन सुरू होणा-या या बेमुदत उपोषणामध्ये जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांनी जास्तीत जास्त मोठया संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन जेएनपीटी साडेबारा टक्के जमीन पाठपुरावा कमिटी तर्फे करण्यात आले आहे 





थोडे नवीन जरा जुने