शासकीय अधिकाऱ्यांकडून कामास विलंब.खोपटा पूल जंक्शन, उरण ते एनएच-४ब या कोस्टल रस्त्याच्या दुरूस्ती कामात होणाऱ्या दिरंगाई विरोधात दि. ०२ जून २०२३ रोजी उरण सामाजिक संस्थे तर्फे धरणे आंदोलनाची हाक.
शासकीय अधिकाऱ्यांकडून कामास विलंब.उरण दि २९(विठ्ठल ममताबादे )
खोपटा पूल जंक्शन, उरण ते एनएच-४ब या सुमारे दोन अडिच किलोमिटर लांबीच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या साडेतीन कोटी रूपये कामाची फाईल अंतिम मंजुरीसाठी सिडको कार्यालयात एक महिन्यापासून प्रलंबित आहे . याआधी सदर रस्त्याच्या दुरूस्तीचे काम पाच-सहा महिने रेंगाळत ठेवून योग्यप्रकारे झालेले नाही या कारणासाठी उरण सामाजिक संस्थेतर्फे दि. १२/०५/२०२३ रोजी कार्यकारी अभियंता (द्रोणागिरी - १ ) यांना धरणे आंदोलनाची नोटीस दिली होती. त्यावेळी सदर साडेतीन कोटी रूपयांच्या कामास लवकरात लवकर अंतिम मंजुरी मिळून ते काम लागलीच सुरू होईल अशी माहिती उरण सामाजिक संस्थेला देण्यात आली होती. त्यामुळे उरण सामाजिक संस्थेतर्फे आयोजित केलेले दि. १२ मे २०२३ रोजीचे धरणे आंदोलन उरण सामाजिक संस्थेने स्थगित केले होते.
 सदर रस्त्याचे डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी व्हावे यासाठी उरण सामाजिक संस्थे तर्फे सिडको कार्यालयात पाठपुरावा सुरु होता.कारण पावसाळ्यात या रस्त्याची अत्यंत दूरवस्था होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना, वाहनचालकांना अतोनात त्रास सहन करावा लागणार आहे. म्हणून येत्या ३१ मे पुर्वी सदर कामास सुरूवात झाली नाही तर सदर रस्त्याच्या कामास होणाऱ्या दिरंगाईकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उरण सामाजिक संस्थेतर्फे शुक्रवार दि. ०२ जून २०२३ रोजी खोपटा पूल जंक्शन, उरण येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी दिली.शासकीय अधिकारी वर्गा कडुन या कामास विलंब होत असल्याने याबाबत जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.थोडे नवीन जरा जुने