पनवेल परिसरात आढळला मृतदेह






पनवेल परिसरात आढळला मृतदेह
पनवेल दि २८, (संजय कदम ) : पनवेल परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.




            सदर इसमाचे अंदाजे वय ४० ते ४५ वर्षे, रंग सावळा, उंची अंदाजे चार फूट पाच इंच, डोक्याचे केस काळे व मध्यम वाढलेले, चेहरा उभट, दाढी मध्यम वाढलेली, अंगाने मध्यम आहे तसेच अंगात फुल बाह्याचा तपकिरी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची फुल पॅन्ट व फिक्कट ग्रे रंगाचे अंतर्वस्त्रे घातलेले आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी ०२२- २७४५२३३३ किंवा पोलीस उपनिरीक्षक उद्धव सोळंके यांच्याशी संपर्क साधावा 


थोडे नवीन जरा जुने