आजच्या धकााधकीच्या जीवनशैलीत अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांनी ग्रासले आहे. हे आजार झाल्यानंतर त्याचे परिणाम शरीराच्या इतर अवयवांवर होतात. मधुमेहाचा परिणाम सर्वात अगोदर डोळ्यांवर होतो. त्यामुळे डोळ्यांची निगा कशी राखायची याची माहिती नसल्याने अनेकांना अंधत्व आल्याचे निदर्शनास येते. हे आजार होऊ नये यासाठी.रहेनुस लॉजिस्टिक व्हिजन फाउंडेशन ऑफ इंडिया, कलंबोलीचे माजी नगरसेवक राजेंद्र शर्मा ,राजू रोडवेज यांच्या संयुक्त विद्यमानाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
व शिबिरात उपचार करणारे डॉक्टर्स अधुनिक तंत्राच्या सहायाने उपचार करण्यात आले व त्यात मधुमेह झाल्यानंतर अनेकांना रेटिना व ग्लुकामाचे आजार संभवतात. असे आजार उद्भवू नये, यासाठी त्यात मार्गदर्शन देखील करण्यात आले व सदर शिबिराचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला
शिबिराचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकाचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी नागरिकांना ६०० मोफत चष्मे वाटप करण्यात आले तसेच ज्यांना नेत्र शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अश्या 56 नागरिकांना मोफत डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याचे चे नियोजन करण्यात आले त्यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस रमेश जी मुंडे , रेहनुस लॉजिस्टिकचे डायरेक्टर श्री प्रेक्षित शेठ माजी नगरसेवक अमर पाटील कळंबोली शहराध्यक्ष पाटील नगरसेवक बबन मुकादम मल कोठारी मंडळ सरचिटणीस संजय दोडके संदीप म्हात्रे , अमर ठाकूर , ज्येष्ठ नेते देविदास खेडकर , आबा घुटुकडे ,अजित पवार, जमीर शेख व भाजपचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
सिडको हंसध्वनी सोसायटीचे अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार तथा सर्व सदस्य देखील कार्यक्रमाला उपस्थित होते त्यावेळी सर्व नागरिकांना अल्प उपहार देण्यात आला व डोळ्यांच्या घेण्याची निगा व काळजी यासंदर्भात देखील सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच नेत्र तपासणी केल्यानंतर प्रत्येक नागरिकांना मोफत थर्मास पाण्याची बॉटल देण्यात आली नागरिकांनी शिबिराचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला व अनेक नागरिकांनी नगरसेवक राजेंद्र शर्मा यांचे आभार व्यक्त केले
Tags
पनवेल