मुजोर रिक्षा चालकांचा खेळ खल्लास!मुजोर रिक्षा चालकांचा खेळ खल्लास!महापालिका प्रशासनाचे फलक झळकले; प्रवासी वर्गाला दिलासा
मुजोर, बोगस रिक्षा चालक आमदारां प्रशांत ठाकूरांच्या मांडीवर !
नागरिक, प्रवाशांनो आता खुशाल मीटरची मागणी करा किंवा हेल्पलाईनवर तक्रार नोंदवा: पनवेल महापालिका प्रशासन
पनवेल: गेली अनेक दशके मीटरप्रमाणे रिक्षा चालाव्यात, या माफक अपेक्षेने प्रवासी वर्ग व्यथित होता. पनवेल संघर्ष समितीने याविरोधात उभारलेल्या लढ्याला यश आले असून आरटीओ, वाहतूक पोलिसांच्या धडक कारवाईनंतर पनवेल महापालिकेने सर्वत्र यासंदर्भात फलक लावून मुजोर रिक्षा चालकांचा कणाच मोडला आहे. दरम्यान, बोगस आणि मीटरला विरोध असणाऱ्या रिक्षा चालकांना आ. प्रशांत ठाकूर यांच्या वंदे मातरम रिक्षा संघटनेत प्रवेश देवून प्रवासी वर्गावर सूड उगारण्याचा कट आखला आहे.गेल्या पंधरवड्यात पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी महापालिका क्षेत्रातील सर्व शहरांमध्ये मीटरप्रमाणे रिक्षा सुरु कराव्यात, याकरिता अमारण उपोषण पुकारले होते. उपोषणाला प्रारंभ झाल्यानंतर आरटीओ आणि वाहतूक शाखेने दिलेल्या लेखी आश्वासानंतर घेतलेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे दणक्यात कारवाई सुरु केली आहे. पनवेल महापालिकेचे उपायुक्त गणेश शेट्ये यांनी पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे, कळंबोली, तळोजे फेस १/२, खारघर आदी शहरातील रिक्षा नाके, रेल्वे स्टेशन आणि महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी फलक लावून मीटरप्रमाणे भाडे आकारणी करावी, जवळचे भाडे नाकारू नये, प्रवाशांची उद्धट वर्तन करू नये, गणवेश परिधान करणे, तीन पेक्षा जास्त प्रवासी घेण्यास विरोध करणे आदीविषयी रिक्षाचालकांना तंबी देणारे फलक लावून संदर्भीय मुद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ११२ आणि ९००४६७०१४६ या क्रमांकावर त्वरित तक्रार दाखल करावी अशी सूचना करण्यात आली आहे.पनवेल महापालिकेच्या साधारणत: दोन हजार प्रबोधनकारी सूचना फलकांमुळे प्रवासी वर्गात जागृती होईल शिवाय मुजोर रिक्षा चालकांना लगाम बसणार आहे. याशिवाय आरटीओ आणि वाहतूक विभागाची कारवाई अधिक तीव्रपणे राबविण्यात येणार आहे.

पनवेल संघर्ष समितीने नागरिक आणि प्रवाशांच्या जिव्हाळ्याच्या विषयाला गांभीर्यपूर्वक हात घातल्याने दररोजच्या लाखो प्रवाशांची परवड थांबण्यास मदत होईल, आणि खिशाची लुट थांबेल. आता प्रवाशांनी थोडे धीट होवून मीटरची मागणी करूनच रिक्षात बसावे, असे आवाहन कांतीलाल कडू यांनी केले आहे.
मुजोर रिक्षा चालक 
आ. प्रशांत ठाकूरांच्या मांडीवर!
—————————————बोगस रिक्षा चालक, परमिट आणि विमा पॉलिसी नसलेले तसेच प्रवाशांची उद्धट वर्तन करणारे काही रिक्षा चालक कारवाई होताच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वंदे मातरम रिक्षा संघटनेत घुसले आहेत. ठाकुरांनी मतांवर डोळा ठेवून त्यांच्या संघटनेत सहभागी करून घेतले आहेत. शिवाय त्यांच्या संघटनेचे अधिकृत सदस्त्व देत ३२० रुपये वार्षिक फी आकारून पनवेल संघर्ष समितीने फुकारलेल्या मीटरसाठीच्या लढ्याला खीळ घालण्याचे उपादव्याप सुरु केल्याने सर्वसामान्य नागरिक चीड व्यक्त करत आहे. तर आमदार ठाकूर सोबत असताना आमचे कोण वाकडे करतो, असे मुजोर रिक्षा चालक सरकारी यंत्रणेला आव्हान देत आहेत.


थोडे नवीन जरा जुने