माजी बांधकाम सभापती सिद्धार्थ बांठिया भाजपच्या प्रदेश कार्यकारणीवर








माजी बांधकाम सभापती सिद्धार्थ बांठिया भाजपच्या प्रदेश कार्यकारणीवर
 पनवेल /प्रतिनिधी
 काँग्रेस चे प्रदेश कार्यकारणी सदस्य पनवेल नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती केंद्रात आणि राज्यात बहुपरीचित असलेले पांवे मधील नामवंत उदयोजक सिद्धार्थ बांठिया यांनी नुकताच भाजप मध्ये प्रवेश केला होता 


.त्यांची राजकीय कारकीर्द आणि कामाची पद्दत पाहून भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सिद्धार्थ बांठिया यांना नियुक्ती पत्र दिले आहे. बऱ्याच कालावधीच्या राजकीय विश्रांतीनंतर सिद्धार्थ बांठिया यांचे पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्याचे यावरून चित्र दिसत आहेत.


भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र कार्यकारणीमध्ये 2023 मध्ये आपली प्रदेश कार्यकारी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


आपले खूप खूप अभिनंदन! भारतीय जनता पक्षाच्या वृद्धीकरता कार्यकारणीतील प्रत्येक सदस्य महत्त्वाचा असून आपल्या अनुभवाचा लाभ संघटनात्मक वाढीसाठी उपयुक्त ठरेल असं मला विश्वास आहे ,असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.



थोडे नवीन जरा जुने