मराठी कन्येची दंत वैद्यकीय शास्त्रात जागतिक स्तरावर भरारी






मराठी कन्येची दंत वैद्यकीय शास्त्रात जागतिक स्तरावर भरारी



उरण दि 5(विठ्ठल ममताबादे )S.M.B.T. दंत महाविद्यालय, संगमनेर , नगर. येथे "असिस्टंट प्रोफेसर " पदावर कार्यरत असणाऱ्या डॉ. दामिनी विलास पाटील( M.D.S. एन्डोडोंटिस्ट ) हिचा
जन्म ता. 05/11/1995 वशेणी, ता: उरण येथील एका गरीब घराण्यात झाला.वडील प्रा. विलास गोपाळ पाटील ( M.A. ,M.Ed.)



हे दादर येथील श्री समर्थ व्यायाम मंदिर अध्यापक विद्यालयात प्राध्यापक म्हणून तर आई रामेश्वरी विलास पाटील ( B.Sc. , M.Ed. , D.S.M. , Dip. V. G.) टिळक नगर, चेंबूर, मुंबई येथील आमची शाळा विद्यालयात शिक्षिका व समुपदेशिका म्हणून कार्यरत आहेत. आणि भाऊ देवेंद्र हा B.Sc. AME नवी मुंबई येथे शिक्षण घेत आहे.
    डॉ.दामिनी पाटील चे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण CBSC बोर्डाच्या D.A.V. पब्लिक स्कूल, नेरुळ, नवी मुंबई येथे तर पदवी शिक्षण B.D.S.येरळा दंत महाविद्यालय, खारघर, नवी मुंबई.( 2013-18 )येथे आणि पदयुत्तर शिक्षण 
M.D.S. (एन्डो.कांसर्व्हेटिव्ह डेंटेस्टरी ) M.I.D.S.R. दंत महाविद्यालय, लातूर . ( 2019-22 ) येथे झाले.



    शिक्षण क्षेत्रातील कार्यरत आई वडिलांच्या नोकरी व्यवसायातील प्रभाव आणि उत्तम मार्गदर्शनामुळे डॉ. दामिनी पाटील ही नर्सरी व पहिली ते बारावी पर्यंत प्रथम A+ श्रेणीतूनच पास झाली. शिक्षणाबरोबरच शालेय जीवनात कला, क्रीडा व संस्कृतिक विभागातीलअनेक स्पर्धेत सहभागी होऊन बक्षिसास पात्र ठरणाऱ्या डॉ.दामिनीने निबंध लेखन, चित्रकला आणि स्केटिंग स्पर्धेतही भाग घेऊन बक्षीस मिळविली आहेत.


"टेबल टेनिस" हा तिचा आवडीचा खेळ. या क्षेत्रात शालेय स्तरापासून तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर सुद्धा प्रथम क्रमांकाची बक्षीसे मिळविली असून डॉ.दामिनी CBSC बोर्डाच्या नॅशनल लेवल टेबल टेनिस स्पर्धेत गोल्ड मेडल विनर आहे. या सर्वात भर म्हणून शालेय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षा, होमीभाभा बाळ वैज्ञानिक परीक्षा, CBSC टॅलेंट सर्च परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळविले असून अलीकडेच M.U.H.S.च्या डिसेंबर, 2022 मधील राज्यस्तरीय शोधनिबंध प्रेझेन्टेशन स्पर्धेत "असिस्टंट प्रोफेसर" गटातून द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.


    डॉ. दामिनी यांचे M.D.S. शिक्षण घेत असताना कांसर्व्हेटिव्ह डेंटेस्टरी विषयातून आत्तापर्यंत ९ लघु शोध निबंध प्रकाशित झाले असून आत्तापर्यंत दंत वैद्यकीय क्षेत्रातील 
  1) Dentin Bonding Agent Conventional and Current Concept
   2) Regenerative Endodontics A paradigm shift in the Management of Immature Teeth with Open Apex
   3) Dentin Bonding Agent Evaluation and Clinical Considerations
   4) Dentin Bonding Agent ( पहिले पुस्तक आणखी एका प्रकाशकांनी प्रकाशित केले.)
   डॉ दामिनी पाटील हिचे दुसऱ्या क्रमांकाचे पुस्तक Regenerative Endodontics हे दंत वैदयकीय क्षेत्रातील पुस्तक जागतिक स्तरावर नऊ देशात त्या त्या देशातील भाषांमध्ये रूपांतरित होऊन प्रकाशित झाले आहे.जसे अमेरिका, युरोप, रशिया, जर्मनी, फ्रेंच, इटली व पोर्तुगीज इत्यादी भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे. ही सर्व पुस्तके गुगल, अमेझॉन, फ्लिफकार्ट वर ऑनलाईन विक्रीसाठी उपलबध आहेत. 



     अलीकडेच एप्रिल 2023 मध्ये 10 वा शोधनिबंध Endodontic Management Of The Mandibular First Molar With Six Root Canal : Case Report "
JETIR या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.






आणि अभिमानास्पद की एप्रिल 2023 मध्ये Journal Of Emerging Technology And Innovative Research "( An International Peer Reviewed Journal )
या प्रकाशनात डॉ.दामिनी यांची "रिव्ह्यूवर मेम्बर" म्हणून निवड झाली आहे.



    एका मराठी मुलीचे दंत वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत कमी वयामध्ये केलेले लेखन ही मराठी माणसाला कौस्तुकस्पद आणि अभिमानास्पद गोष्ट असल्याने समाजातील विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून डॉ. दामिनी चे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रतिसाठी शुभेच्छा दिल्या असून समाजातील सर्व स्तरातून डॉ.दामिनी आणि पाटील परिवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


थोडे नवीन जरा जुने