नवी मुंबई शहरातील उलवे परीसरात बेकायदेशीर देशी व विदेशी दारूची विक्री करणाऱ्यावर एन आर आय सागरी पोलिसांनी कारवाई करत 1, 325 रुपये किंमतीची दारू जप्त केली आहे. याप्रकरणी एन आर आय सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
. पोलीस उप निरीक्षक अंकुर शेलार व पोलीस हवालदार सुळे पेट्रोलिंग करताना एका खास बातमीदाराकडुन पोलिसांना माहिती मिळाली की, भुमीपुत्र भवन से 19 ए उलवेच्या बाजुला असणारे मोकळया सिडकोप्रणित प्लॉट जवळ दत्ता दाईक यांचे घरासमोर एक इसम संशयीत रित्या उभा असुन तो काहीतरी विक्री करीत आहे.
त्यामुळे पोलीस त्वरीत मिळालेल्या माहिती प्रमाणे वर नमुद ठिकाणी गेलो असता एक इसम हातात पांढ-या रंगाची पिशवी घेवुन संशयीतरित्या उभा होता. तो इसम दारु विक्री करीत असल्याचा संशय आल्याने त्यास पोलीसनी जागीच पकडले. त्याचे जवळील पांढ-या रंगाचे पिशवी तपासुन पाहीली असता त्यामध्ये देशी व विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या त्यावरून तो दारू विक्री करीत असल्याची खात्री झाली.
आरोपीचा नाव समाधान अमृत नाईक, वय 39 वर्षे आहे. आरोपी समाधान त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याजवळील सुमारे 1 हजार 325 रुपयांची देशी व विदेशी दारू पोलिसांनी जप्त केली आहे. एन आर आय सागरी पोलीस ठाण्यात समाधान अमृत नाईक याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. एन आर आय सागरी पोलीस अधिक तपास करत आहे.
Tags
पनवेल