स्थानिक युवकांच्या सक्षमीकरणासाठी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट

स्थानिक युवकांच्या सक्षमीकरणासाठी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट
पनवेल(प्रतिनिधी) स्थानिक युवकांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करून त्यांच्यासाठी रोजगार संधींमध्ये वाढ करून त्यांना सक्षम बनविण्याच्या उद्दिष्टाने टाटा स्टीलने आपल्या खोपोली प्लांटच्या जवळ जे.एन.टाटा व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे उद्घाटन केले. स्थानिक युवकांमध्ये कौशल्य विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.     
  उदघाटन समारंभासाठी कर्जत-खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे, विश्वनिकेतन ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ एस एस इनामदार, टाटा स्टील मेरामंडली ऑपरेशन्स विभागाचे उपाध्यक्ष आणि न्यू मटेरियल बिजनेस व ग्राफिनचे सुबोध पांडे आणि टाटा स्टील खोपोली व होसूरचे एक्झिक्युटिव्ह प्लांट हेड कपिल मोदी आणि एलअँडडीच्या चीफ, चीफ डायव्हर्सिटी ऑफिसर व जेएनटीव्हीटीआयच्या सेटलर जया सिंग पंडा उपस्थित होते.             यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी स्थानिक विद्यार्थ्यांना आवाहन करताना सांगितले की, त्यांनी जेएनटीव्हीटीआय ट्रेनिंग सेंटर आणि त्यांच्या अभ्यासक्रमांबद्दल अधिक माहिती जाणून घ्यावी. विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रात करियर घडवता येईल यासाठी सुसज्ज करावे यासाठी त्यांनी सेंटरला प्रोत्साहित केले. या संस्थेला आपला नेहमी पाठिंबा राहील असे आश्वासन देत त्यांनी ट्रेनिंग सेंटरच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या.

      स्थानिक युवकांच्या सक्षमीकरणासाठी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे एन टाटा व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर हे खोपोली येथील विश्वनिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एंट्रप्रिन्युअरशिप अँड इंजिनीयरिंग टेक्नॉलॉजीच्या परिसरात असून, वर्गात अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. “स्टेलर ६०” ही या संस्थेची पहिली बॅच असून यामध्ये मेकॅनिकल सुपरवायजर, वेल्डर कम गॅस कटर, इलेक्ट्रिशियन आणि साईट सेफ्टी सुपरवायजर अशा विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात आले आहेत. जेएनटीव्हीटीआयने कर्जत, खालापूर, पिल्लई इंजिनीयरिंग कॉलेज, रसायनी, केएमसी कॉलेज खोपोली इत्यादी ठिकाणी प्रवेश मोहीम राबवली होती. प्रवेशासाठी मूल्यांकन करण्यात आलेल्या ३७५ विद्यार्थ्यांपैकी ६३ जणांना पहिल्या बॅचमध्ये प्रवेश मिळाला आहे.

थोडे नवीन जरा जुने