कालकथित पँथर मनोजभाई संसारे आदरांजली वाहण्यासाठी अभिवादन सभेचे आयोजनकालकथित पँथर मनोजभाई संसारे आदरांजली वाहण्यासाठी अभिवादन सभेचे आयोजन
पनवेल दि.२४ (वार्ताहर) : फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा ढाण्या वाघ स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख "कालकथित पँथर मनोजभाई संसारे" यांना आदरांजली वाहण्यासाठी रविवार २८ मे रोजी पनवेल शासकीय विश्रामगृह येथे आदरांजली व अभिवादन सभेचे आयोजन रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. मनोज संसारे हे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते. ते दोन वेळा मुंबई महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. २०२४ च्या निवडणुकीत ते विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या वतीने लढणार होते. त्यांनी आपल्या आयुष्यात कधीही तत्वांशी तडजोड केली नाही. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. 
त्यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांना अभिवादन व आदरांजली वाहण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विविध पक्षाच्या, संघटनेच्या त्याचबरोबर वेगवेगळ्या समूह माध्यमातून परिवर्तनवादी आंबेडकरी चळवळीत कार्यरत असणाऱ्या पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, सदस्य, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर व मित्र परिवार यांच्या वतीने रविवार २८ मे रोजी सायंकाळी ४ वाजता शासकीय विश्रामगृह पनवेल येथे आदरांजली व अभिवादन सभेचे आयोजन स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे.थोडे नवीन जरा जुने