ऍड नितीन मोहिते यांना पितृशोकऍड नितीन मोहिते यांना पितृशोक
पनवेल दि.२४ (वार्ताहर) : खालापूरमधील नामांकित नामांकित ऍड नितीन मोहिते यांचे वडील कृष्णा रामा मोहिते यांचे वयाच्या 69 व्या वर्षी आकस्मित निधन झाल्याने मोहिते कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.  


           चळवळीतील निष्ठावान सैनिक असलेलले दिवगंत कृष्णा रामा मोहिते यांचे ह्दयविकाराने दुःखद निधन झाले. कृष्णा मोहिते यांनी गेली अनेक वर्षे मस्को कंपनीत इमानदारीनी मेल्टींगशाॅपमध्ये नोकरी केली. वासरंग येथील सामाजिक क्षेत्रातील चांगले कामाची पोहचपावती असणारा समाज सेवक काळाच्या पडद्याआड निघून गेल्याची भावना समाजातून व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनानंतर शोक सभा व पुण्यानुमोदणाचा कार्यक्रम २६ मे रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरी खालापूर तालुक्यातील वासरंग गावी होणार आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमास त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित राहावे अशी विनंती ऍड नितीन मोहिते यांनी केली आहे.


थोडे नवीन जरा जुने