आदरणीय सर/ मॅडम
अपघात ठिकाण व वेळ*-: आज दि.15/05/2023 रोजी पहाटे 04:40 वा.चे सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे रोडवर मुंबई लेनवर कि.मी.22/000 खालापूर पोलीस ठाणे हद्दीत प्राणांतिक अपघात घडलेला आहे.
प्राणांतिक अपघात
अपघातातील वाहन 1) अज्ञात वाहन
2) किया कार क्र. MH 04 LH 9479
अपघातचे कारण-*:- ता.म वेळी व जागी यातील किया कार क्र. MH 04 LH 9479
या वाहनावरील चालक अभिषेककुमार मुन्नीलाल साहू वय.37 हे त्यांचे ताब्यातील कार घेऊन कोल्हापूर येथून देवदर्शन करून भिवंडी येथे पुणे- मुंबई द्रुतगती मार्गाने चालवित घेऊन जात असताना किमी.22/000 येथे आले असता त्यांनी रस्त्याची परिस्थिती न पाहता वेगात वाहन चालवून पुढे चालणाऱ्या अज्ञात वाहनाला डाव्या बाजूने जोरात धडक देऊन अपघात झाला आहे .
अपघातानंतर सदरची कार 50 मीटर पुढे जाऊन शोल्डर लेनवर थांबली होती . *कारच्या एअर बॅग खुल्या झाल्या होत्या तसेच कारचा डाव्या बाजूकडील पुढील टायर फुटलेला दिसत आहे .* सदर अपघातात 1) मुन्नीलाल साहू वय.68 वर्षे रा.फ्लॅट नं.904 ,ए विंग,इको पोलीस बिल्डिंग, मानकोली,ता.भिवंडी,जि.ठाणे यांचे डोक्याला गंभीर दुखापती झाल्यामुळे *108 रुग्णवाहिकेवरील डॉक्टरांनी त्यांना तपासून जागेवर मयत घोषित* केले आहे तसेच 2)चालक अभिषेक मुन्नीलाल साहू वय.37 वर्षे रा.फ्लॅट नं.904 ,ए विंग,इको पोलीस बिल्डिंग, मानकोली,ता.भिवंडी,जि.ठाणे यांचे डोक्याला *गंभीर दुखापत* झाली आहे
3)शांतीदेवी मुन्नीलाल साहू वय.60 वर्षे यांचे डावे पायाला फ्रॅक्चर होवून *गंभीर दुखापत* झाली आहे.
4) लक्ष्मीकुमारी अभिषेककुमार साहू वय.33
रा.फ्लॅट नं.904 ,ए विंग,इको पोलीस बिल्डिंग, मानकोली,ता.भिवंडी,जि.ठाणे यांचे चेहऱ्याला किरकोळ खरचटल्याच्या दुखापती झाल्या आहेत तसेच कुमारी त्रिशा अभिषेक साहू वय पाच वर्ष व कुमार दर्शील अभिषेक साहू वय एक वर्ष या दोन लहान मुलांना काही एक दुखापत झालेली नाही
. मयत यांस पुढील कार्यवाहीसाठी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे खोपोली नगर परिषदेच्या रुग्णवाहिकेने पुढील कार्यवाहीसाठी रवाना केले आहे व जखमींना आयआरबीच्या रुग्णवाहिकेने एमजीएम हॉस्पिटल येथे दवा उपचाराकरिता पाठवण्यात आले आहे.
सदरची कार सुरक्षितरित्या रस्त्याच्या डावे बाजूला बॅरीकेटच्या आतमध्ये उभी आहेत. सदर ठिकाणी वाहतूक सुरळीत चालू आहे.अपघाताच्या ठिकाणी म.पो.केंद्र पळस्पे मोबाईल स्टाफ व आय.आर.बी. स्टाफ हजर होते. सदर अपघाताची माहिती खालापूर पोलीस ठाणेस तात्काळ कळवली आहे.
Tags
खालापूर