महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या महिला सन्मान योजनेला उरण मध्ये उत्तम प्रतिसाद.
उरण दि ११(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र शासनाने रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये "महिलांना" ५०% सवलत देण्याचा धोरणात्मक निर्णय व दि. १७ मार्च २०२३ पासुन "महिला सन्मान योजना" नावाने रा.प महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये महिलांना प्रवासभाडयात ५० % सवलत देण्यात आली. त्या नुसार दि. १७ मार्च २०२३ पासुन “महिला सन्मान योजना" अमलात आली.
या योजनेमुळे सर्व महिलांनी उत्फुर्तपणे भाग घेउन इतर वाहनांपेक्षा रा.प महामंडळाच्या बसेस ने प्रवास करण्याची पसंती दर्शवीली व या योजनेमुळे रा. प महामंडळाकडे महिला प्रवासी जास्तीत जास्त संख्येने प्रवास करू लागल्या.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई विभागातील उरण आगाराने या योजनेची महती जाणुन तालुक्यातील नियमित रा.प. बसने प्रवास करणा-या प्रवाशी भगिनींना प्रबोधित करून रा.प बसने प्रवास करण्याचे आवाहन केले. त्यामुळे उरण तालुक्यातील व इतर महिला प्रवाशांनी भरपुर प्रमाणात लाभ घेउन महामंडळाच्या उत्पन्नात समाधानकारक वाढ केली.
माहे एप्रिल २०२३ मध्ये रा.प. महामंडळाच्या महिला सन्मान योजना अंतर्गत उरण तालुक्यातील व इतर अंदाजे महिला असे एकुण १,५२, ४८९ ( एक लाख बावन्न हजार चारशे एकोननव्वद ) इतक्या महिला प्रवाशी भगिणींनी लाभ घेउन रा.प. महामंडळाच्या बसने प्रवास करूण उरण आगारास रूपये. ३२,०९,२८८ /- (बत्तीस लाख नउ हजार दोनशे अठठेरऐंशी मात्र) एवढी रक्कम मिळवून दिली आहे.
उरण आगार प्रशासन व आगार व्यवस्थापक सतिश तुळशीराम मालचे यांनी सर्व प्रवाशांचे आभार मानत अशाच प्रकारे उरण तालुक्यातील महिला प्रवाशांनी रा.प माहमंडळाच्या उरण आगाराच्या बसने प्रवास करून उरण आगाराला व रा.प. महामंडळाला जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून दयावे व “महिला सन्मान योजनेचा" सर्व महिला प्रवाशी भगिनींनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
Tags
उरण