कोशिशतर्फे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून सूर पनवेलचा प्रातकालीन मैफिलीला उत्स्फूर्त प्रतिसादकोशिशतर्फे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून "सूर पनवेलचा"; प्रातःकालीन मैफिलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल(प्रतिनिधी) कोशिश फाऊंडेशन पनवेलतर्फे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून आज (दि. १३) झालेल्या "सूर पनवेलचा" या सुरेल मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रत्येक शनिवारी पनवेलच्या वडाळे तलावाजवळ होणाऱ्या प्रातःकालीन मैफिलीला वाढता असा प्रतिसाद पनवेलकरांकडून मिळतो आहे.


 यावेळी गायिका सानिका राजवाडे यांच्या सुमधूर आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. त्यांना हार्मोनियमवर मिहीर टाकसळे तर युवा वाद्य कलाकार आदित्य उपाध्ये यांनी तबल्यावर उत्तम अशी साथ दिली. सूर पनवेलचा कार्यक्रमाचे मुख्य संयोजक अभिषेक पटवर्धन यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या स्वरमय कार्यक्रमास शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, प्रज्ञा प्रकोष्ट उत्तर रायगड जिल्हा संयोजक डॉ. मयुरेश जोशी, गणेश जगताप, किरण गोखले यांच्यासह रसिक प्रेक्षक उपस्थित होते.कोशिश फाऊंडेशन तर्फे पनवेलमध्ये अश्या सुरेल प्रातः कालीन मैफिली होत आहेत आणि लोक उत्तम प्रतिसाद देत असल्याने पनवेल व आसपासच्या परिसरातील कलाकारांना वाव मिळत आहे, त्यामुळे दर शनिवारी पनवेलकर रसिकांना ही उत्तम संगीत पर्वणी आहे आणि त्याचा प्रतिसाद हा दिवसेंदिवस वाढत आहे. 

थोडे नवीन जरा जुने