अनधिकृत झोपडपट्ट्यांवर महापालिकेची कारवाई
अनधिकृत झोपडपट्ट्यांवर महापालिकेची कारवाई
पनवेल दि.३० (वार्ताहर) : कळंबोली सेक्टर ८ मधील भूखंडावर नव्याने बांधलेल्या १० अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महानगरपालिकेने सोमवारी कारवाई केली.         कळंबोली सेक्टर ८ मधील एका भूखंडावर दहा नवीन झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. त्या मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जेसीबीच्या साहाय्याने हटविल्या आहेत. मनपाच्या दक्षतेमुळे नवीन झोपडपट्टी वसविण्याचे मनसुबे उधळले आहेत.
 महानगरपालिका कार्यक्षेत्रातील झोपड्या व इतर अतिक्रमणांवरही महानगरपालिकेच्या माध्यमातून आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी नियमित कारवाई केली जात असून त्याठिकाणी लक्ष ठेवण्यात येत आहे. अश्याच प्रकारे पनवेल शहर परिसरात व प्रामुख्याने मोहल्ला परिसरात अनधिकृत झोपडपट्ट्या उभारण्याचे काम काही समाजकंटक करीत आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशी करीत आहेत.  थोडे नवीन जरा जुने