महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर गुरुवारी न्हावेखाडीला


महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर  गुरुवारी न्हावेखाडीला 

पनवेल (प्रतिनिधी) सुमधूर आवाजाची जादू असलेली महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर गुरुवारी १ जून रोजी न्हावेखाडी येथे रसिकांच्या भेटीला येणार आहे. निमित्त आहे ते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे. 


दानशूर व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ०२ जून रोजी ७२ वा वाढदिवस आहे. त्या निमिताने सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने ग्रामस्थ मंडळ न्हावेखाडी व श्री म्हसेश्वर मंदिर कमिटीच्यावतीने गुरुवार दिनांक ०१ जून रोजी सायंकाळी ७. ३० वाजता श्री म्हसेश्वर मंदिर न्हावेखाडी रामबाग येथे सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर यांच्या सुमधूर आवाजातील मराठी हिंदी जुनी-नवीन गाणी, कोळीगीत, चित्रपटगीत, लावणी आणि गझलांची सायंकालीन मैफिल आयोजित करण्यात आली आहे. यावेळी आर्या आंबेकरच्या सुरेल आवाजाची जादू रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. थोडे नवीन जरा जुने