उरणमध्ये मोफत अभिनय कार्यशाळेचे आयोजन.
उरणमध्ये मोफत अभिनय कार्यशाळेचे आयोजन.

 उरण दि 31 ( विठ्ठल ममताबादे )उरण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 1 जून 2023 ते 6 जून 2023 या कालावधीत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके
 सभागृह, तेलीपाडा, उरण येथे अमित भगत मित्र मंडळ यांच्या वतीने वयोगट 7 ते 16 असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभिनय कार्यशाळेत नाट्य व कास्टींग डायरेक्टर संकेत ओक, अभिनेता दिग्दर्शक मयुर जयसिंग, फुलपाखरू फेम अभिनेता निलय घैसास,लेखिका निवेदिका - वृंदा दाभोलकर याचे उत्तम असे मार्गदर्श लाभणार आहे. नाव नोंदणी व अधिक माहिती साठी 9594255202 आणि 9833205232 या फोन नंबर वर अधिकाधिक इच्छूक उमेदवारांनी, विद्यार्थ्यांनी संपर्क साधावे असे आवाहन अमित भगत मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे.


थोडे नवीन जरा जुने