उरणच्या प्रमिला पवार यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले विदयाभूषण पुरस्कार प्रदान.
उरणच्या प्रमिला पवार यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले विदयाभूषण पुरस्कार प्रदान.

उरण दि 20(विठ्ठल ममताबादे )
अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र, "मराठी साहित्य मंडळ" या संस्थेतर्फे राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले विद्याभूषण पुरस्कार 2023 ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या शुभहस्ते जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयाच्या शिक्षिका प्रमिला संतोष पवार यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शुक्रवार दि. 19/5/2023 रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे येथे प्रदान करण्यात आला.उरण मधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांच्या त्या पत्नी आहेत. उरणच्या प्रमिला संतोष पवार यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले विदयाभूषण पुरस्कार 2023 मिळाल्याने प्रमिला पवार यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


थोडे नवीन जरा जुने