रेल्वे कर्मचाऱ्यालाच बसला प्रवासात मोबाईल चोरीचा फटका






रेल्वे कर्मचाऱ्यालाच बसला प्रवासात मोबाईल चोरीचा फटका
पनवेल दि.१ (संजय कदम) : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते पनवेल लोकलने प्रवास करणारे रेल्वेचे लोको पायलटला मोबाइल चोरीचा फटका बसला आहे. अज्ञात चोरट्याने त्यांचा मोबाईल चोरून नेला आहे. रेल्वे प्रवासात वाढत्या चोरीचा फटका या रेल्वे कर्मचाऱ्यालाच बसला आहे.



पनवेलमध्ये वास्तव्यासाठी असलेले लोको पायलट अनिलकुमार कैलासप्रसाद हे गावावरून मुंबईला आले. बोरिवली ते कुर्ला प्रवास केल्यानंतर त्यांनी पनवेल लोकलच्या प्रथम वर्गाच्या डब्यातून प्रवास सुरू केला. गावावरून मुंबईत येताना प्रवासाचा थकवा आल्याने त्यांना लोकलमध्ये झोप लागली. खांदेश्वर रेल्वे स्टेशनमध्ये त्यांना जाग आली असता त्यांच्या खिशातील ४२ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या घटनेविषयी पनवेल रेल्वे स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.


थोडे नवीन जरा जुने