उरण शहरातील गणपती चौकातील श्रीराम मंदिराचे प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण उत्साहात संपन्न.
उरण दि 13( विठ्ठल ममताबादे) उरण मधील सर्वात जुने मंदिर म्हणून उरण शहरातील गणपती चौकातील श्रीराम मंदिर प्रसिद्ध आहे. 110 वर्षापूर्वीचे हे मंदिर आहे. हे मंदिर जूने झाल्याने या मंदिराचे जिणोध्दार करण्यात आले. या जीर्णोद्धार निमित्त श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
बुधवार 10/5/2023 रोजी शोभायात्रा (कलश यात्रा) देवालय वास्तू पूजन, स्थापित देवता पूजन गुरुवार दि 11/5/2023 रोजी देवता पूजन - स्नपन विधी न्यास,अभिजीत मुहूर्त प्राण प्रतिष्ठा, श्रीफळ आहूती द्वारा पुर्णाहुती, शुक्रवार दि 12/5/2023 रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा,दुपारी महाप्रसाद, रात्री श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ बेलवली ,पनवेल आणि करळ जेएनपीटी यांचे सुरेख व सुंदर असे भजन झाले.
बुवा- जगदीश भोईर नवघर,पखवाज:- निशांत कोळी, नितीन वर्तक,चालक:- प्रदीप तांडेल,साथकरी:- शंकर ठाकूर, अशोक पाटील, कृष्ण घरत, विष्णू पवार,विष्णू भोईर देवा तांडेल हसूराम तांडेल पुंडलिक पाटील आणि इतर मंडळींनी भजन गाऊन भाविक भक्तांची मने जिंकली. मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली होती.अशा प्रकारे वर्धापन दिना निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वच धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाविक भक्त मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात आमदार महेश बालदी यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते,विविध सामाजिक संस्था, संघटनेचे पदाधिकारी सदस्यांनी सहभागी घेऊन देव दर्शन घेतले.एकंदरीत श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा, मूर्ती प्रतिष्ठा व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात,उत्तम प्रतिसादासह संपन्न झाल्याची माहिती मंदिराचे ट्रस्टी चंद्रकांतभाई भाईचंदभाई ठक्कर यांनी दिली.
Tags
उरण