बेवारस वाहने ओळख पटवून नेण्याचे सीबीडी पोलीस ठाण्याचे आवाहन


बेवारस वाहने ओळख पटवून नेण्याचे सीबीडी पोलीस ठाण्याचे आवाहन
पनवेल दि.०२ (संजय कदम) : सीबीडी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये उभ्या असलेल्या बेवारस ३८ मोटारसायकली ओळख पटवून नेण्याचे आवाहन सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी केले आहे.                   सीबीडी परिसरात बेवारस वाहनांचे मालक मिळून येत नसल्यामुळे ही वाहने ठाण्याच्या आवारात अनेक वर्षे मालकांच्या प्रतीक्षेत धूळ खात पडून आहेत. त्यामुळे सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी पुढाकार घेऊन बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सीबीडी पोलिसांनी आवारात उभ्या असलेल्या ३८ मोटारसायकली ओळख पटवून नेण्याचे आवाहन केले आहे. या मोटारसायकलीमध्ये एमएच ०५ एव्ही ७३८४ काळ्या रंगाची बजाज पल्सर, एमएच ०३ एक्यू ८७३६ क्रमांकाची काळा भगवा रंग यामाहा कंपनीची मोटारसायकल, एमएच ४६ ४७१४ क्रमांकाची काळी रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर, एमएच ०४ ईई ४० क्रमांकाची काळी व लाल पट्टी असलेली बजाज प्लॅटीना, एमएच ०३ वाय ९६५५ क्रमांकाची निळया रंगाची बजाज पल्सर, एमएच ०३ बीव्ही ४७०३ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची हिरो मेस्ट्रो स्कुटी, एमएच ०३ बीएल ७५१० क्रमांकाची काळ्या रंगाची होन्डा एक्टीव्हा स्कुटी, एमएच ०४ सिक्यू ३६३३ क्रमांकाची जांभळया रंगाची टिव्हीएस स्टार सिटी, एमएच ०६ एपी ४३८८ क्रमांकाची काळ्या रंगाची बजाज पल्सर, एमएच ३१ एवाय ४२२० क्रमांकाची काळ्या निळ्या रंगाची हिरो होन्डा पेंशन, एमएच ०४ इव्ही १८९६ क्रमांकाची काळ्या रंगाची टिव्हीएस वेगो, एमएच ०३ वाय ५०६८ काळा निळा रंगाची हिरो होन्डा पेंशन, एमएच ०६ बीके ५३६५ क्रमांकाची काळ्या रंगाची होन्डा एक्टीव्हा, एमएच ३८ ए २८५१ क्रमांकाची काळ्या निळ्या रंगाची हिरो होन्डा
 स्प्लेंडर, एमएच ०४ एचएच ३८९२ क्रमांकाची काळ्या रंगाची होन्डा एक्टीव्हा, एमएच ४३ बीजे ६४०५ क्रमांकाची सिल्व्हर रंगाची टिव्हीएस ज्युपिटर, एमएच ४३ एएम ७५०४ क्रमांकाची काळया रंगाची टिव्हीएस वेगो, एमएच ४६ बिएक्स ०६८९ क्रमांकाची काळया रंगाची होन्डा डिओ, एमएच ४७ एस ००५० क्रमांकाची पांढ-या रंगाची होन्डा डिओ, एमएच ०१ एक्यू ८०३० क्रमांकाची काळया रंगाची होन्डा एक्टीव्हा, एमएच ०२ एडब्ल्यू ८२४९ क्रमांकाची लाल रंगाची बजाज पल्सर, एमएच ०३ टी ९३१९ क्रमांकाची काळया रंगाची व भगव्या रंगाची पट्टी असलेली हिरो होन्डा स्प्लेंडर, एमएच ०२ एफए ५३०० क्रमांकाची लाल रंगाची बजाज पल्सर, एमएच ०१ एक्यू ९६३६ क्रमांकाची निळया रंगाची बजाज एव्हेंजर, एमएच ४३ के २३०० क्रमांकाची लाल रंगाची बजाज पल्सर, एमएच बी ३२४३ क्रमांकाची काळया रंगाची हिरो होन्डा सीडी १००, एमएच ०६ एयु ४७५८ क्रमांकाची काळया रंगाची स्प्लेंडर प्लस तसेच पांढ-या रंगाची टिव्हीएस वेगो, 


काळानिळया रंगाची हिरोहोन्डा पेंशन, काळया रंगाची सुझुकी एक्सेस स्कुटी, लाल रंगाची एनटॉर्क १२५, लाल रंगाची हिरो प्लीझर स्कूटी, मॉडीफाय केलेली लाल रंगाची डिस्कव्हर, सिल्व्हर रंगाची हिरो होन्डा करिझमा, हिरो होन्डा स्प्लेंडर, सिल्व्हर रंगाची हिरो होन्डा सीबीझेड, लाल रंगाची बजाज सीटी १००, लाल निळया रंगाची हिरो होन्डा स्प्लेंडर यांचा समावेश आहे. तरी या मोटारसायकलीच्या मालकांनी योग्य ती कागदपत्रे दाखवून ती न्यावी असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी केले आहे तसेच अधिक माहितीसाठी पोलीस हवालदार सुधीर राठोड यांच्याशी संपर्क साधावा.थोडे नवीन जरा जुने