शिवसेना उपशाखा प्रमुख प्रतिक वाजेकर यांच्या मागणीची पालिकेकडून दखल; कुंभारवाडा परिसरातील नालेसफाईच्या कामाला सुरुवात


शिवसेना उपशाखा प्रमुख प्रतिक वाजेकर यांच्या मागणीची पालिकेकडून दखल; कुंभारवाडा परिसरातील नालेसफाईच्या कामाला सुरुवात 
पनवेल दि.०२ (संजय कदम) : कुंभारवाडा परिसरातील नालेसफाई करून औषधे फवारणी करा अशी मागणी शिवसेना उपशाखा प्रमुख प्रतिक वाजेकर यांनी पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यांच्या मागणीची पनवेल महापालिकेने तात्काळ दखल घेत कुंभारवाडा परिसरातील नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे.             कुंभारवाडा परिसरातील संत गोरा कुंभार मंदीर व परिबाबा सय्यद उस्मानशाह बाबा यांचा दर्गा परिसरातील नाल्यामध्ये घाण साठले आहे. यामुळे परिसरात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न व दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेने तात्काळ या ठिकाणची साफसफाई करावी अशी मागणी शिवसेना उपशाखा प्रमुख प्रतिक वाजेकर यांनी पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती. 
त्यांच्या मागणीची पनवेल महापालिकेने तात्काळ दखल घेत कुंभारवाडा परिसरातील नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी प्रतीक वाजेकर यांचे आभार मानले.


थोडे नवीन जरा जुने