पागोटे गावात पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या कामाचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते भूमीपूजन.







पागोटे गावात पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या कामाचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते भूमीपूजन.
उरण दि 1(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायत हद्दीत पिण्याच्या पाण्याची साठवणूक करणारे टाकी (जलकुंभ )बांधण्यात यावे अशी ग्रामस्थांची अनेक वर्षापासून मागणी होती.



 ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून पागोटे ग्रामपंचायतचे सरपंच कुणाल पाटील, उपसरपंच सुजित तांडेल व ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी गावच्या विकासासाठी एकत्र येत गावात पिण्याच्या पाण्याची टाकी (जलकुंभ )बांधण्याचा संकल्प केला. त्या अनुषंगाने जलजीवन मिशन या योजने अंतर्गत ग्रामपंचायत पागोटे उच्चस्तर पाण्याच्या टाकीचे (जलकुंभचे )बांधकामाचे भूमीपूजन आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले



. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाचे गटनेते गणेश शिंदे, द्रोणागिरी शिवसेनेचे अध्यक्ष जगजीवन भोईर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष भार्गव पाटील, सरपंच कुणाल पाटील, उपसरपंच सुजित तांडेल, ग्रामसेविका समीक्षा ठाकूर,ग्रामपंचायत सदस्य -मयूर पाटील,सतीश पाटील, अधिराज पाटील, प्राजक्ता पाटील, 



करिश्मा पाटील,सोनाली भोईर, सुनीता पाटील , समृद्धी तांडेल, ग्रा. सु. मंडळ अध्यक्ष आशिष तांडेल, उपाध्यक्ष धीरज पाटील , ज्येष्ठ सामाजिक कार्यकतें - मनोहर पाटील, महेश पाटील, मुकुंद पाटील, सुनिल तांडेल, रजनिकांत पाटील, कैलास पाटील,विश्वनाथ म्हात्रे, हसुराम तांडेल, रामकृष्ण पाटील,कुमार मढवी,महेंद्र पाटील , दिनेश भोईर,विश्वनाथ पाटील , विनायक पाटील,पंढरीनाथ तांडेल , विश्वजीत ठाकूर, प्रदिप पाटील,मनोहर तांडेल, गणेश पाटील आदी पागोटे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



1664 लोकसंख्या असलेल्या पागोटे गावात 90,000 लिटरच्या क्षमतेचे पाण्याची टाकी (जलकुंभ )बांधण्यात येणार असल्याने पागोटे गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या या कार्याचे कौतुक करत सर्वांचे आभार मानले.नागरिकांच्या, ग्रामस्थांच्या समस्या लक्षात घेउन सरपंच कुणाल पाटील, उपसरपंच सुजित तांडेल व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी अनेक लोकोपयोगी विविध विकासकामे सुरु केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.


थोडे नवीन जरा जुने