खोटे दागिने खरे असल्याचे भासवून दोघा भामट्यांनी केली ज्वेलर्स चालकांची फसवणूक






खोटे दागिने खरे असल्याचे भासवून दोघा भामट्यांनी केली ज्वेलर्स चालकांची फसवणूक
पनवेल दि २२ (वार्ताहर) : खोटे दागिने खरे असल्याचे भासवून दोघा भामट्यांनी नवीन पनवेल भागातील ऐश्वर्या ज्वेलर्स व तनिष्का ज्वेलर्समध्ये हे दागिने मोडून दोन्ही ज्वेलर्स चालकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. किरण पाटील व प्रवीण पाटील असे या दोघा भामट्यांची नावे आहेत.



                 वंदना नवीन पनवेलमधील सुकापूर भागात ऐश्वर्या ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. किरण पाटील त्यांच्या दुकानात सोन्याची चेन मोडण्याच्या बहाण्याने गेला होता. या वेळी त्याने त्याची आई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये पैसे भरण्यासाठी सोन्याची चेन मोडत असल्याचे सांगितले. तसेच या चेनची पावती नसल्याचे सांगत माझे आधार कार्ड व पॅन कार्ड दुसऱ्या दिवशी आणून देतो, असे सांगून वंदना भोसले यांना आपले नाव व मोबाईल क्रमांक दिला.




 आईच्या उपचारासाठी त्याला पैशाची गरज असल्याने भोसले यांनी जास्त चौकशी न करता वर वर सोन्याच्या चेनची पाहणी करून त्याला ५० हजार रुपये दिले. दुसऱ्या दिवशी वंदना भोसले यांनी हे दागिने घेऊन मिडास लॅबमध्ये कॅरेट व वजन तपासणीसाठी दिले असता, ही चेन बनावट असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यावर त्यांनी वंदना भोसले यांनी किरण पाटील याने दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला. मात्र, त्याचे दोन्ही फोन बंद असल्याचे आढळून आले



. त्यानंतर त्यांनी किरण पाटील याच्या मोबाईलवर संपर्क साधला असता, तो बंद असल्याचे समजले तसेच त्याने दिलेला पत्ताही चुकीचा असल्याचे त्यांना समजले. तर दुसऱ्या घटनेत नवीन पनवेल सेक्टर-१२ मधील तनिष्क ज्वेलर्स या दुकानात प्रवीण पाटील हा भामटा गेला व त्याने दुकान मालकीण मंदाकिनी फडतरे यांना खोटी पोकळ होलो डिझाईनची सोन्याची चेन मोडण्यास देऊन त्यांच्याकडून रोख रक्कम घेतली. या चोरट्याने देखील अशाच प्रकारे मंदाकिनी फडतरे यांना फसवून पैसे घेऊन पसार झाला. या दोन्ही घटनांची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.


थोडे नवीन जरा जुने