बौध्दजन पंचायत समिती उरणच्या पदाधिका-यांची बिनविरोध निवड






बौध्दजन पंचायत समिती उरणच्या पदाधिका-यांची बिनविरोध निवड


 उरण दि 8 (विठ्ठल ममताबादे ) भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बौद्धजन पंचायत समितीची सन 2023 ते 2026 साठी निवडणूक लोकशाही पध्दतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाले.


 बौद्धजन पंचायत समिती ही संपूर्ण भारतात कार्यरत असून या समितीच्या माध्यमातून विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबविली जातात अशा या समितीच्या उरण शाखा क्रमांक 843 च्या अध्यक्षपदी प्रकाश धर्मा कांबळे,उपाध्यक्ष पदी हरेश दामोदर जाधव,चिटणीस पदी विजय रामचंद्र पवार, उपचिटणीस पदी रोशन पांडुरंग गाढे , खजिनदार-अनंत बुधाजी जाधव यांची एकमताने बिनविरोध निवड झाली आहे.


 ही निवड 2023 ते 2026 या कालावधीकरीता झाली आहे. सदर बिनविरोध निवडून आलेले पदाधिकारी हे गेली अनेक वर्षे बौद्ध‌जन पंचायत समितीने दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन, अंमलबजावणी करत आहेत. समाजात विविध धार्मिक सामाजिक उपक्रम राबवून समाज जागृती, देश जागृती करत आहेत.त्यामूळे सदर पदाधिका-यांची बहुमताने एकमताने बिनविरोध निवड झाली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


थोडे नवीन जरा जुने