लोहप - चौक मार्गावर मो-या टाकण्यांचे काम पुर्ण,रस्ता दुरुस्ती करण्यास विसर.....
लोहप - चौक मार्गावर मो-या टाकण्यांचे काम पुर्ण,रस्ता दुरुस्ती करण्यास विसर.....


काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : १३ मे, लोहप - चौक या मार्गावर पावसाळ्यात पाणी शेतात जमा झाले,की काही वेळा ते रस्त्यावर येत असते.तर काही ठिकाणी असलेल्या मो-या जिर्ण झाल्यामुळे या ठिकाणी नविन मो-या टाकण्यात आल्या. मात्र ज्या ठिकाणी मो-या बसविण्यात आल्या आहेत तेथे डांबरिकरण न करता माती टाकून प्रवासी वर्गांची समजूत घालण्यात आली आहे.यामुळे या ठिकाणी खड्डा निर्माण होवून शरिरिक व्यधी निर्माण होत आहे.शिवाय या ठिकाणी वहान गेल्यावर धुळ निर्माण होत असल्यामुळे यापासून श्वसनांचे आजार होण्यांची दाट शक्यता निर्माण झाली आहे.  
                या रस्त्यावर सातत्याने रेल - चेल सुरु असून ,चौक येथे असलेल्या बाजार पेठेत खरेदि साठी या परिसरातील शेकडो नागरिक या ठिकाणी खरेदि साठी जात असतात.परिणामी या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ सातत्याने पहावयास मिळत असल्यामुळे. या रस्त्याच्या दोन्ही बाजुनी रस्ता रुंदिकरणांचे काम सुरु असल्यांचे पहावयास मिळत आहे.वहानांचा वाढता,वेग आणी वापर यामुळे या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्यात आले.एका बाजुनी प्रवासी वर्गांची गैरसोय होत असल्यांचे दुर केली जात आहे.मात्र दुसरी कडे धुळीचा सामना हे समीकरण या ठिकाणी निर्माण झाले आहे.            चौक मार्गावरील आसरोटी येथे मो-या टाकण्यात आल्या आहेत. ह्या ठिकाणी शेती असल्यामुळे हा रस्ता चार फुट उंच असल्यामुळे या ठिकाणी मो-या बसविण्यात आल्या.मात्र डांबरिकरण न केल्यामुळेच प्रवासी वर्गाकडून नाराजीचा सुर निघत आहे.सदर या मो-याच्या ठिकाणी लवकरात् लवकर डांबरिकरण करावे अशी मागणी प्रवासी वर्ग करीत आहे.

थोडे नवीन जरा जुने