आगामी येणाऱ्या नगरपालिकेच्या, पंचायत समितीच्या व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी सज्ज
आगामी येणाऱ्या नगरपालिकेच्या, पंचायत समितीच्या व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी सज्ज 


पनवेल दि. ०७ ( संजय कदम ): आगामी येणाऱ्या नगरपालिकेच्या , पंचायत समितीच्या व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी सज्ज झाली असल्याची माहिती रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी घेतलेल्या बैठकीत दिली . 


                       स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी महाड येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती . या बैठकीला रायगड जिल्हा कार्याध्यक्ष विजय धोत्रे महाडचे अध्यक्ष व इतर कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीमध्ये आगामी येणाऱ्या नगरपालिकेच्या , पंचायत समितीच्या व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांविषयी चर्चा केली 

. त्याचप्रमाणे दीप स्तंभ सामाजिक संघटनेच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले .थोडे नवीन जरा जुने